Ameet Satam : मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत धमकी!

23 Nov 2025 18:05:34
Ameet Satam
 
मुंबई : (Ameet Satam) मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना फेसबुकवरून धमकी मिळाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अमानत खान नावाच्या एका व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह येत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनाल थेट धमकी दिली आहे. या धमकीत राजकीय भाषा वापरण्याबाबत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना कमजोर न समजण्याबाबत चेतावणी देण्यात आली आहे. (Ameet Satam)
 
हेही वाचा :  Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका, आज होणारा लग्नसोहळा स्थगित
 
दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी तात्काळ कारवाई करत बांगूर नगर पोलीस ठाण्यात अमानत खानविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सध्या भाजपकडून या सर्व प्रकाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्याबरोबरच, काँग्रेस मुंबईमध्ये भयाचे वातावरण पसरवत असल्याचे देखील बोलण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा भाजप मंत्री मंगल प्रभात लोढा यांनाही अशाच प्रकारची धमकी मिळाल्याचे भाजपकडून नमूद करण्यात आले आहे. आता भाजपकडून मागणी करण्यात येत आहे कि, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. (Ameet Satam)
 
 
Powered By Sangraha 9.0