सिंधुदुर्ग : (Match Fixing) कणकवली तालुक्यात शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती आहे. पण मालवणमध्ये ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. या पद्धतीची मॅच फिक्सिंग (Match Fixing) कशासाठी? असा सवाल मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी माजी आ.वैभव नाईक यांना केला.(Match Fixing)
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, "पहिल्या दिवसापासूनच मालवण नगरपरिषदेची निवडणूक विकासाच्या मुद्दयावर लढवण्याची आमची स्पष्ट भूमिका आहे. भाजपच्या विचारांचे नेते निवडून आल्यानंतर मालवण शहराचा विकास कसा करणार, कुठल्या मुद्यावर लक्ष केंद्रित करणार हा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांशी संवाद साधत असून मतदारांचा अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या उमेदवारांना मिळत आहे. मालवण शहरात पारंपारिक ठाकरे सेनेचे मतदार वर्षानुवर्षे त्यांना मतदान करतात. त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाईक का फसवत आहेत? हाकेच्या अंतरावर असलेल्या कणकवली तालुक्यात शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती आहे. पण मालवणमध्ये ते एक(Match Fixing) मेकांच्या विरोधात लढत आहेत. या पद्धतीची मॅच फिक्सिंग (Match Fixing) कशासाठी याचे उत्तर माजी आमदार वैभव नाईक यांनी दिले पाहिजे."
वैभव नाईक यांनी भूमिका स्पष्ट करावी
"कणकवलीमध्ये ठाकरेंचा जिल्हाप्रमुख निवडणूक आणण्यासाठी तुम्हाला शहर विकास आघाडी स्थापन करावी लागते. त्यात सर्व पक्ष भाजपच्या विरोधात लढतात. मग मालवण शहरात मतदारांनी याबद्दल का विचार करावा? पारंपारिक ठाकरे सेनेच्या मतदारांची ही फसवणूक नाही का? ज्यांनी वर्षानुवर्षे ठाकरे सेनेला मतदान केले त्या मतदारांना तुम्ही का फसवता? याचे उत्तर माजी आमदार वैभव नाईक यांनी द्यावे. भाजप आपल्या मतदारांना कधीच फसवत नाही. विकास आणि राष्ट्रीयत्व याच्याशी आम्ही कधीच तडजोड करत नाही. आमचे चारही नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार कमळ याच चिन्हावर लढत आहेत. आम्ही अशी मॅच फिक्सिंग (Match Fixing) करत नाही. कणकवलीत फक्त भाजपच्या विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र यायचे आणि मालवणमध्ये शिंदेसेना आणि ठाकरे सेनेने एकमेकांच्या विरोधात मतदान मागायाचे. अशा भूमिकेवर वैभव नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. आपल्या पारंपारिक मतदारांना फसवण्याची भूमिका घेऊन मौनी बाबा म्हणून तुम्ही गप्प बसत असाल तर येणाऱ्या २ तारखेला मालवण शहरातील सुज्ञ मतदार विचार करतील," असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.(Match Fixing)
ते पुढे म्हणाले की, "अवैध मत्समारीमुळे आमच्या स्थानिक मच्छिमारांना त्रास होईल, अशी कुठलीच भूमिका आम्ही घेत नाही. आपण ड्रोनची सुरक्षा वाढवतो आहोत. आचारसंहिता संपल्यानतंर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करून किनारपट्टीवर आधुनिक आणि स्टीलच्या गस्तीनौक आणणार आहोत. कोणत्याही मच्छिमाराला बेघर न करता आमच्या मच्छिमारांना तिथेच हक्काची घरे कसे मिळवून देता येईल यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरु आहे," असेही त्यांनी सांगितले.(Match Fixing)