पुणे : (Andekar Gang) माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Andekar Gang) यांच्या हत्येनंतर या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आक्रमक भूमिका घेतली होती. गेल्या तीन महिन्यांत या टोळीने दोन खून केल्याची घटना घडल्याने सुरक्षित समजल्या जाणारे पुणे असुरक्षित झाले होते. यात आयुष कोमकर आणि गणेश काळे या दोघांची हत्या करण्यात आली. आयुष कोमकर हा आंदेकर गटाचा प्रमुख बंडू आंदेकर याचा नातू होता. अंतर्गत मतभेदातून त्याची निर्दयी हत्या करण्यात आली होती. (Andekar Gang)
हेही वाचा : Mangal Prabhat Lodha : मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आमदार अस्लम शेख यांनी दिली धमकी
वनराज आंदेकर (Andekar Gang) खून प्रकरणातील संशयित समीर काळेच्या भावाची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे आंदेकर (Andekar Gang) गटाने पुणे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण केल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आंदेकर (Andekar Gang) टोळीचा कणा असलेल्या बंडू आंदेकरच्या तीनही मुलांना सार्वजनिक पद्धतीने धिंड काढत नानापेठेत फिरवले. आयुष कोमकर हत्येचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर या तिन्ही भावांची पोलिसांनी धिंड काढली. आंदेकर टोळीची (Andekar Gang) सर्वाधिक दहशत असलेल्या गणेश पेठ आणि नाना पेठ परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. याआधी पोलिसांनी आंदेकरांच्या (Andekar Gang) आर्थिक स्रोतांना उध्वस्त करत दणका दिला होत. त्यानंतर पालिकेने त्यांचे अनधिकृत बांधकाम, कमानी पडल्या होत्या. पुणे पोलिसांनी अलीकडच्या काळात गुन्हेगारीविरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे. (Andekar Gang)