डोंबिवली : (Mayur Bhoir) कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रहिवासी मयूर संतोष भोईर (Mayur Bhoir) याने दुबई येथे पार पडलेल्या एस बी के एफ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पोहणे व धावणे या दोन्ही प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत चार पदके जिंकली आहेत. या कामगिरीबद्दल शिवसेनेतर्फे मयूरचा अत्याधुनिक सायकल देऊन सन्मान करण्यात आला.(Mayur Bhoir)
उल्हासनगर शेजारील मानेरे गावातील मयुर (Mayur Bhoir) हे रहिवासी आहे. त्याचे वडील संतोष हे रिक्षाचालक आहे. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत मयुरने (Mayur Bhoir) हे यश संपादन केले आहे. मयूरने स्विमिंगमध्ये २ सुवर्ण, १ कांस्य तसेच ५००० मीटर धावणे १ सुवर्ण अशी एकूण चार पदके मिळवून मानेरे गावासह ठाणे जिल्हा व महाराष्ट्र राज्याची मान उंचावली. मयूरच्या नेत्रदीपक कामगिरीची माहिती समोर येताच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.(Mayur Bhoir)
हेही वाचा : Sandeep Deshpande : महाविकास आघाडीसोबत जाण्यास मनसेचाही नकार?
मयूरचा खेळातील सराव अधिक शास्त्रोक्त व प्रगत पद्धतीने व्हावा, यासाठी शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून, कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते मयूरला अत्याधुनिक सायकल प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.(Mayur Bhoir)
दरम्यान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण यश मिळविणे हे मयूरसारख्या प्रतिभावान खेळाडूंसाठी मोठे प्रेरणास्थान असल्याचे यावेळी आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.(Mayur Bhoir)