मुंबई : (Sandeep Deshpande) महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही, असे वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केले आहे. काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर एकमेकांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत.(Sandeep Deshpande)
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी आपल्याशी युती करावी, अशी काँग्रेस नेत्यांची मनोमन ईच्छा आहे. तर दुसरीकडे, मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास शरद पवार सकारात्मक असल्याचे बोलले जाते.(Sandeep Deshpande) मिळालेल्या माहितीनुसार, मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता, मग निवडणूक का वेगळी लढवता? असे मत शरद पवार यांनी व्यक्त केल्याचे समजते.(Sandeep Deshpande)
हेही वाचा : CIDCO : सिडकोतर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर गृहनिर्माण योजना जाहीर
आम्हाला देणेघेणे नाही - संदीप देशपांडे
या सगळ्यावर बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले की, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही. मनसे हा स्वतंत्र पक्ष असून राज ठाकरे हे आमच्या पक्षाचा निर्णय घेत असतात. त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात? उद्धव ठाकरे काय बोलतात? शरद पवार मनसेबद्दल काय बोलतात? याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमचा निर्णय राज ठाकरे योग्यवेळी करतील," असे ते म्हणाले.(Sandeep Deshpande)
दुसरीकडे, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी पुन्हा एकदा मनसेसोबत यूती नको, असा पुनरुच्चार केला. "आम्ही काही लोकांसोबत जाऊ शकत नाही हे मी आधीपासून सांगितले होते. शरद पवार हे या देशाचे जेष्ठ नेते असून आमच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मान आहे. आम्ही आमचा निर्णय हा कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करून घेतलेला आहे. यासंदर्भात आम्ही दिल्लीतील नेत्यांशीसुद्धा चर्चा केली आहे. शरद पवार यांचा पक्ष आणि आमचा पक्ष हे समविचारी पक्ष आहेत. मागच्या ४० वर्षांपासून आमची त्यांच्याशी यूती आहे," असे त्या म्हणाल्या. या सगळ्यात आता काँग्रेस स्वबळाचा निर्णय मागे घेणार का? आणि शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.(Sandeep Deshpande)