Miss Universe 2025 : मेक्सिकोच्या फातिमा बॉशने पटकावला 'मिस युनिव्हर्स २०२५'चा किताब!

21 Nov 2025 16:08:32
Miss Universe 2025
 
मुंबई : (Miss Universe 2025) थायलंडच्या बँकॉक शहरामध्ये 'मिस युनिव्हर्स २०२५' (Miss Universe 2025) या स्पर्धेचा अंतिम सोहळा शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी मोठ्या दिमाखदार पार पडला. यंदाच्या ७४ वा मिस युनिव्हर्सचा किताब मेक्सिकोच्या फातिमा बॉश (Fatima Bosch) हिने पटकावला. गतवर्षीची विजेती ७३ व्या मिस युनिव्हर्स डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया केजर थेइलविग हिने फातिमा यांना मुकुट देऊन सन्मान केला. (Miss Universe 2025)
 
त्याबरोबर थायलंडची प्रवीणर सिंग ही उपविजेती ठरली. तर व्हेनेझुएलाची स्टेफनी ॲड्रियाना अबस्ली नसीर, फिलिपिन्सची अतिसा मनालो आणि आयव्हरी कोस्टच्या ऑलिव्हिया यास यांनी दुसरी, तिसरी आणि चौथी रनर-अप म्हणून यश मिळवले. याच स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मनिका विश्वकर्मा हिने केले होते. तिला टॉप ३० मध्ये प्रवेश करत आपले स्थान मिळवले. मात्र, टॉप १२ मधून तिला बाहेर पडावे लागले. (Miss Universe 2025)
 
हेही वाचा : मालेगाव अत्याचारप्रकरणी जनआक्रोश; संतप्त आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न
 
कोण आहे यंदाची मिस युनिव्हर्स?
 
अवघ्या २५ वर्षांची फातिमा बॉश (Fatima Bosch) मिस युनिव्हर्स (Miss Universe 2025) बनली आहे परंतु, इथवरचा तिचा प्रवास नक्कीच खडतर आणि आव्हानात्मक होता. तिला डिस्लेक्सिया, एडीएचडी आणि हायपरएक्टिव्हिटी असल्याचे निदान झाले होते, परंतु तिने या सर्व अडथळ्यांना तिच्या ताकदीत रूपांतरित केले व जगासमोर एक नवा दृष्टीकोन मांडला. फातिमाने मेक्सिकोमधील युनिव्हर्सिडॅड इबेरोअमेरिकाना येथे फॅशन आणि अ‍ॅपेरल डिझाइनमध्ये पदवी घेतली असून नंतर तिने इटलीतील मिलान येथील NABA – नुओवा अकादमिया डी बेले आर्टी येथे तिचे पुढील शिक्षण घेतले. तिला मुळातच फॅशनबाबत अतिशय रुची आहे व त्याचदृष्टीने ती सध्या कार्यरत आहे. स्पर्धेदरम्यानही तिला अनेक वादग्रस्त आव्हांनानाही सामोरे जावे लागले, परंतु यावेळीही ती स्थैर, जिद्द अणि चिकाटीने प्रत्येक आव्हांनाना सामोरी गेली. तिचा हा मिस युनिव्हर्स होण्याचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. (Miss Universe 2025)
 
शेवटच्या प्रश्नावर फातिमानं दिलेलं उत्तर काय होतं?
 
शेवटच्या प्रश्नासाठी जेव्हा तिला विचारले गेले की, तुम्ही तुमच्या मिस युनिव्हर्स (Miss Universe 2025) किताबाचा वापर तरुणींना सक्षम करण्यासाठी कसा कराल? यावर तिने उत्तर दिले की, "मिस युनिव्हर्स (Miss Universe 2025) म्हणून, मी त्यांना सांगेन की तुम्ही तुमच्या प्रामाणिक शक्तीवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, तुमची स्वप्ने महत्त्वाची आहेत. कोणालाही तुमच्या मूल्यांवर आणि स्वप्नांवर शंका घेऊ देऊ नका, कारण तुम्ही मौल्यवान आहात." (Miss Universe 2025)
 
 
Powered By Sangraha 9.0