Koregaon Park : कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी वारसदारांचे जबाब नोंदवले

21 Nov 2025 18:12:47

Koregaon Park
 
पुणे :(Koregaon Park) कोरेगाव पार्कजवळच्या (Koregaon Park) मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीचा जबाब गुरुवारी नोंदविण्यात आला. दुसर्यांना हा जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेने तिघांचे जबाब नोंदविले आहेत.या प्रकरणी हेमंत गावंडे, शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, तहसीलदार सूर्यकांत येवले यांना पुणे पोलिसांनी जबाब नोंदविण्याबाबत नोटीस बजावली आहे. हेमंत गावंडे यांनी सोमवारीच जबाब नोंदवला होता. याप्रकरणात विविध शासकीय विभागांकड्रन कागदपत्रे मागविली आहेत या कागदपत्रांची तपासणी सरू आहं. तपासात गरज भासल्यास शीतल तेजवानी यांना चौकशील पन्हा बोलविण्यात येईल, दिग्विजय पाटील यांन नोटीस दिली असून, ते अद्याप जबाबासाठी हजर झालेले नाहीत.(Koregaon Park)
 
हेही वाचा : Andekar Gang : आंदेकर टोळीच्या प्रमुखांची धिंड 
 
जमिनीच्या कागदपत्रांवर २७५ जणांची नावे आहेत. त्यातील १० जणांना पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. ही जमीन कुलमुख्यारपत्र करुन शीतल तेजवानी यांना संबंधित व्यक्तींनी दिली आहे त्याअनुषंगाने तपास सूरू आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांचीही पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती मिळत आहे. आर्थिक गुन्हे शाखेत येवले यांची चौकशी करण्यात आली.जमिनीचे मूळ वतनदार आपला जबाब नोंदवण्यासाठी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झाले आहेत. शीतल तेजवानीचा जबाब नोंदवल्यानंतर आता त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहे. मागील आठवड्यात काहीजणांनी आपले जबाब नोंदवण्यात आले होते. 10 जणांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. जमीन पुन्हा मिळावी अशी या सर्वांची मागणी असून, गैरव्यवहारातील मूळ तक्रारदार आहेत. नोटीशीत सांगण्यात आलं आहे की, खडक पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा आणि मुंढव्यातील कोरेगाव (Koregaon Park) पार्कमधील ४० एकराची जागा यासंदर्भात पोलिसांना मूळ मालकांकडून काही माहिती घ्यायची आहे.(Koregaon Park)
 
"पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर दोन दिवसांची मुदत घेतली होती. आज आम्ही यासंदर्भात जबाब नोंदवणार आहोत. आम्ही लेखी जबाब देणार असून, तोंडी जबाब देणार नाही. काल शीतल तेजवानीचा जबाब आम्हाला माहिती नाही. पण आम्ही शेतकऱ्यांतर्फे मूळ वतनदारांतर्फ जो जबाब देणार आहोत तो लेखी देणार आहोत," असं त्यांनी सांगितलं आहे."आमची कशाप्रकारे फसवणूक करण्यात आली, तसंच आमच्या अशिक्षित असण्याचा कसा गैरफायदा घेतला यासंदर्भात आम्ही सांगणार आहोत," अशी माहिती वारासदारांनी दिली आहे.(Koregaon Park)
 
 
Powered By Sangraha 9.0