CIDCO : सिडकोतर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर गृहनिर्माण योजना जाहीर

21 Nov 2025 19:59:43
CIDCO
 
नवी मुंबई : (CIDCO) सिडकोच्या (CIDCO)इतिहासात प्रथमच "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" तत्त्वावर 4,508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. शनिवार, दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजेपासून योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे.(CIDCO)
 
या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4,508 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारांना प्रथमच स्वत:च्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.(CIDCO)
 
या योजनेतील सदनिका या तयार (रेडी टू मूव्ह) असून अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. सदनिकेच्या किंमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारांना लगेच सदनिकेचा ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळणार आहे.(CIDCO)
  
ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता cidcofcfs.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजेपासून सुरू होणार आहे. दि. 21 डिसेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (CIDCO) या तत्त्वावर सदनिकांची विक्री केली जाणार असल्याने अर्जदारांनी उपरोक्त कालावधीमध्ये, लवकरात लवकर अर्ज करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.(CIDCO)
 
“सिडकोच्या (CIDCO) सोयी सुविधांनी सुसज्ज गृहसंकुलांतील 4,508 सदनिका (CIDCO) या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेकरिता सोडत किंवा लॉटरी नसून आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य अर्जदारांना आहे. यामुळे त्यांना शब्दश: आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे. पुन्हा एकदा सर्वसामान्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याकरिता अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मी करतो.”(CIDCO)
- विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
 
 
Powered By Sangraha 9.0