मुंबई : (Mumbai District Literature Conference) मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (Mumbai District Literature Conference) यांच्या अनुदानातून ग्रंथाली आयोजित मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाचे (Mumbai District Literature Conference)आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ व दि. २२ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे हा साहित्य जागर पार पडणार आहे.
शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्धाटन (Mumbai District Literature Conference)पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध लेखक-नाटककार भूषवणार असून, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी उद्धाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी राजीव श्रीखंडे लिखित ' ग्लोबल साहित्यसफर - भाग १' या पुस्तकाचे प्रकाशन पार पडणार आहे. शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कवितेचे वारसदार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये डॉ. सिसिलिया कार्व्हालो, किरण येले, महेंद्र कोंडे, वृषाली विनायक आणि संकेत म्हात्रे सहभागी होणार आहेत. दुपारी २ वाजता संहितालेखन आणि एआय या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून चैतन्य सरदेशपांडे, मुक्ता बाम, राजेश देशपांडे आणि मुक्ता चैतन्य सहभागी होणार आहेत. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ देशपांडे करणार आहेत.(Mumbai District Literature Conference)
संध्याकाळी ४ वाजता चंद्रशेखर सानेकर 'एका उन्हाची कैफियत' हा गझलांचा विशेष कार्यक्रमा सादर करणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता विद्याधर पुंडलिक, जयवंत दळवी, आणि गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ८ वाजता या संमेलनाची सांगता होणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ व २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी, साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने या संमेलनाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.(Mumbai District Literature Conference)