Think Big Spaces : ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये ‘थिंक बिग स्पेसेस’ डिजिटल शिक्षण उपक्रम सुरू

20 Nov 2025 20:26:16
Think Big Spaces
 
ठाणे : (Think Big Spaces) ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आणि पाय जाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने अमेझॉनने 'अमेझॉन थिंक बिग स्पेसेस' (Think Big Spaces) या उपक्रमाची सुरुवात केली आहे. ठाण्यातील सरकारी शाळांमध्ये शाश्वत, सर्वसमावेशक डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमातील पहिले केंद्र येऊर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 65 मध्ये सुरू करण्यात आले.(Think Big Spaces)
 
या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन सांगळे, अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे संचालक कॅमेरॉन इव्हान्स, आणि पाय जॅम फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शोएब दार या प्रमुख मान्यवरांसह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.(Think Big Spaces)
 
हेही वाचा : Konkan Railway : कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांत ‘५ जी’ नेटवर्क सुविधा
 
शिक्षक-नेतृत्वाखालील अमेझॉन थिंक बिग स्पेसेस (Think Big Spaces) आणि स्टेम कॉर्नर्स हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवावर आधारित, संगणकाच्या माध्यमातून शिकवण्यावर भर देणारे आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या नऊ शाळांमधील 900 हून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक कौशल्य वाढविण्यासाठी अभ्यासक्रमात संगणकीय विचारशक्ती आणि अभिनव विचारप्रक्रिया समाविष्ट करण्यात आले (Think Big Spaces) असल्यामुळे विद्यार्थ्याच्या कल्पना शक्तीला वाव मिळणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक समस्या ओळखता येतील आणि तंत्रज्ञान-आधारित उपाययोजना करता येतील.(Think Big Spaces)
 
पायाभूत सुविधांसोबतच शिक्षकांच्या कौशल्यवृद्धीलाही या उपक्रमात महत्त्व देण्यात आले आहे. आय सी टी आणि इतर विषयांतील २५० शिक्षकांना संगणक विज्ञान व कोडिंगचे सर्वसमावेशक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून एकूण ७,५०० विद्यार्थ्यांपर्यंत सकारात्मक परिणाम पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. २०१९ मध्ये सुरू झालेल्या 'अमेझॉन थिंक बिग प्रोग्राम' (Think Big Spaces)मधून नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेतील ५५ शासकीय शाळांमध्ये सुरु असलेल्या 'अमेझॉन थिंक बिग स्पेसेस' आणि कॉर्नर्सद्वारे १२,००० विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.(Think Big Spaces)
 
 
Powered By Sangraha 9.0