मुंबई : (Shourya Patil) दिल्लीतील एका हाय प्रोफाइल शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केल्याने, देशभरात एकच खळबळ उडाली आहे. १६ वर्षीय शौर्य प्रदीप पाटील (Shourya Patil) याने सुसाईड नोट लिहत आपले आयुष्य संपले आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने यासाठी त्याच्या शिक्षकांना जबाबदार धरलं आहे. आता या विद्यार्थ्याच्या वडिलांनी थेट पोलिसांत धाव घेत, तीन शिक्षक आणि मुख्यध्यापकांविरोधात तक्रार फाईल केली आहे.
हेही वाचा : Al-Fallah University : अल-फलाह यूनिवर्सिटीसंबंधित आणखी एक धक्कादायक खुलासा, गोरखपूर-अहमदाबादसह देशभरात झालेल्या पाच स्फोटांचा सूत्रधारही अल-फलाह यूनिवर्सिटीचाच विद्यार्थी!
शौर्यने (Shourya Patil) त्याच्या शाळेच्या बॅगेत सुसाईड नोट ठेवली होती. त्याने त्यावर फोन नंबर लिहिला होता आणि ज्याला हे पत्र मिळेल त्याने त्याच्यावर फोन करावा अशी विनंती केली होती. पुढे त्याने लिहिलेलं कि, "आई मला माफ कर, मी तुझं मन खूप वेळा मोडंल आहे, मला माहित आहे. पण आता शेवटचंच. शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका असेच आहेत, मी आता अजून काय बोलू ?" (Shourya Patil)
शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातला खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाय निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीवनगर भागात वास्तव्यास होता.तो दिल्लीतील विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. (Shourya Patil)