मुंबई : ( Aadhar card ) आता आधारकार्डमध्ये नवीन अपडेट येणार आहे, यांत आपल्या आधार कार्डवर फक्त फोटो आणि QR कोडच असू शकतो, नाव देखील छापण्याची शक्यता आहे परंतु आधार क्रमांक मात्र यात दिसणार नाही. हा क्यूआर कोड कस्टम अॅप किंवा यूआयडीएआय-प्रमाणित टूल वापरून नागरिकांना ही माहीती ऑनलाइन पडताळता येईल. आधार कार्डच्या प्रतींचा गैरवापर रोखण्यासाठी हे नवीन नियम तयार केले जात आहेत, असे यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी एका ऑनलाइन परिषदेत सांगितले.
या आधारकार्ड मधील नवीन अपडेटमुळे आता हॉटेल्स, टेलिकॉम सिम कार्ड विक्रेते, कॉन्फरन्स आणि सेमिनार आयोजक आधार फोटोकॉपीचा गैरवापर करू शकणार नाहीत. UIDAI डिसेंबर २०२५ पासून हे नवीन नियम लागू करणार आहे. अनेक संस्थांकडून आधार कार्डच्या फोटोकॉपी साठवल्या जातात, जे आधारच्या नियमानुसार जे चुकीचे आहे यामुळे एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक डेटाचा गैरवापर होऊ शकतो. याचमुळे या नवीन अपडेटमुळे सुरक्षितता वाढणार आहे तसेच बनावट कागदपत्रं बनवणाऱ्यांवर ही आळा बसेल.