Greg Abbott : सीएआयआर संस्था दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

20 Nov 2025 15:30:01

Greg Abbott
 
मुंबई : (Greg Abbott) टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ॲबॉट (Greg Abbott)  यांनी कौन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स (सीएआयआर) या संस्थेला राज्य कायद्यानुसार परदेशी दहशतवादी संघटना आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना म्हणून घोषित केल्याचे निदर्शनास आले. या घोषणेत सीएआयआरला मुस्लिम ब्रदरहुडसोबत सूचीबद्ध करण्यात आले असून, मुस्लिम ब्रदरहुडचे सीएआयआर हे उत्तराधिकारी संघटन असल्याचे ॲबॉट (Greg Abbott) यांनी म्हटले आहे. अशी माहिती आहे की, या निर्णयानंतर टेक्सास राज्यात या दोन संघटनांना जमीन खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच या संघटनांना कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्यांवर कठोर दिवाणी आणि फौजदारी कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.(Greg Abbott)
गव्हर्नर ॲबॉट (Greg Abbott) यांच्या आदेशात सर्वप्रथम मुस्लिम ब्रदरहुडच्या इतिहासाचा आणि विचारसरणीचा उल्लेख आहे. यात ते आंतरराष्ट्रीय इस्लामवादी आंदोलन असल्याचे सांगितले असून, त्याची पायाभरणी सशस्त्र जिहाद आणि शरिया कायद्यावर आधारित जागतिक खिलाफत निर्माण करण्याच्या उद्दिष्टासोबत झाली असल्याचा उल्लेख आहे. संस्थापक हसन अल-बन्ना आणि नंतरचे सर्वोच्च मार्गदर्शक मोहम्मद बदी यांच्या विधानांचा संदर्भ देत ॲबॉट म्हणतात की, या संघटनेची मूलभूत विचारसरणी वर्षानुवर्षे बदललेली नाही. त्यांनी हेही नमूद केले की मुस्लिम ब्रदरहुडचे जाळे जगभर पसरले आहे, आणि त्यात हमास देखील आहे – जो सुरुवातीला मुस्लिम ब्रदरहुडची फिलिस्तीनी शाखा होता.(Greg Abbott)
 
हेही वाचा : State Level Bankers Committee : मुंबई शहर व उपनगरात हक्क न सांगितलेल्या मालमत्तेसाठी २१ नोव्हेंबरला विशेष शिबिरे
 
आदेशात हेही सांगितले की २००८ मध्ये अमेरिकेची एक प्रमुख गुप्तचर संघटना एफबीआयने सीएआयआर सोबतचे अधिकृत संबंध तोडले होते आणि २०२३ मध्ये बायडेन प्रशासनानेदेखील काही फेडरल दस्तऐवजांतून सीएआयआरचा उल्लेख काढून टाकला होता. ॲबॉट (Greg Abbott) यांच्या मते, सीएआयआर सतत अशा व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर ठेवत आला आहे ज्यांचे दहशतवादी संघटनांशी सक्रिय संबंध राहिले आहेत.(Greg Abbott)
 
सीएआयआरशी संबंधित व्यक्तींचा उल्लेख
 
घसान इलाशी — सीएआयआर टेक्सासचे संस्थापक बोर्ड सदस्य आणि होली लँड फाउंडेशनचे कोषाध्यक्ष. २००९ मध्ये दहशतवादी वित्तपुरवठ्यासाठी दोषी ठरवले गेले आणि ६५ वर्षांची शिक्षा सुनावली गेली.
 
अब्दुरहमान आलामूदी — सीएआयआर आयोजित एका रॅलीतील वक्ता; हमास आणि हिज्बुल्लाहचा समर्थक. नंतर अल-कायदाला निधी पुरवण्याबाबत दोषी.
 
रँडल टॉड रोयर — सीएआयआरचा कम्युनिकेशन स्पेशलिस्ट. २००४ मध्ये अल-कायदा आणि तालिबानला मदत केल्याबद्दल २० वर्षे कारावास.
 
बासेम खाफागी — सीएआयआरचा कम्युनिटी रिलेशन्स डायरेक्टर. २००३ मध्ये बँक/व्हिसा फ्रॉड कबूल; कट्टरपंथी गटांना पैसे आणि आत्मघातकी हल्ल्यांचे समर्थन करणारी सामग्री प्रसारित केल्याचे आरोप.
 
रबीह हद्दाद — सीएआयआरसाठी फंडरेजर. ग्लोबल रिलीफ फाउंडेशनच्या प्रकरणात अटक; नंतर देशातून हकालपट्टी.
 
हे वाचलंत का? : आधार पुन्हा एकदा बदलणार; आधारकार्डधारकांचा डेटा आता सुरक्षित राहणार, UIDAI कडून मोठे बदल
 
सीएआयआर आणि त्याचा भारतविरोधी प्रचार
 
सीएआयआर हे इस्लामिस्ट संघटन असून, त्याने अनेक वेळा भारत आणि हिंदूंविरुद्ध विधाने केली आहेत. हमास सोबतच्या संबंधांमुळे त्याची भूमिका अधिक वादग्रस्त ठरते. सीएआयआरने 'डिस्मेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व' या हिंदूविरोधी परिषदेला उघड समर्थन दिले. जानेवारी २०२२ मध्ये सीएआयआरने पत्रकार राणा अय्यूबच्या आधारे हिंदूविरोधी प्रचार चालवला. हिंदी चित्रपट सूर्यवंशीविरुद्ध सीएआयआरने मोहीम राबवली आणि त्याला “हिंदुत्व प्रेरित धोकादायक प्रोपेगंडा” म्हणाले. पाकिस्तानी दहशतवादी आफिया सिद्दीकीच्या सुटकेसाठी सीएआयआरने मोहीम केली. २०२२ मध्ये सीएआयआरने अमेरिकेत इस्लामोफोबिया असल्याचा दावा करणारी 'स्टिल सस्पेक्ट' हा रिपोर्ट प्रसिद्ध केला.(Greg Abbott)
 
 
Powered By Sangraha 9.0