नागपूर : (Mahayuti) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली भेट ही महायुतीच्या (Mahayuti) विजयासाठीची रणनीती आणि प्रशासनिक समन्वयासाठी झालेली असून नाराजीच्या बातम्या “कपोलकल्पित” असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (Mahayuti)
महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट नाराजीची नव्हती. त्यांच्या भेटीत महायुती (Mahayuti) ५१ टक्के मतांनी जिंकावी यावर चर्चा झाली.
बावनकुळे म्हणाले, “मी स्वतः दोन दिवसांपूर्वी एकनाथजी शिंदे यांना भेटलो. ते कुठेही नाराज नव्हते. एनडीएमध्ये नियमितपणे नेते एकमेकांना भेटत असतात. महायुतीने (Mahayuti) ५१ टक्के मतांनी विजय मिळवावा, यासाठीच ही चर्चा झाली.” (Mahayuti)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पक्षांतराविषयी ते म्हणाले, “समन्वय समितीने एकमेकांच्या पक्षातील प्रवेश टाळण्याचे ठरवले असले, तरी उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्ते पक्ष बदलतात. माझ्या कामठी मतदारसंघातही असेच झाले. त्यामुळे महायुतीत कुठलीही गडबड नाही.”डोंबिवलीतील पक्षप्रवेशावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “उमेदवारी न मिळाल्यानंतर कार्यकर्ते हालचाल करतात. या बाबतीत एकनाथ शिंदेजी अमित शहांकडे जाण्याची शक्यता नाही. तक्रारी असल्यास ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे नाही तर माझ्याकडे येतील.” (Mahayuti)
हेही वाचा : टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि आयटीआय मध्ये सामंजस्य करार
ओबीसी आरक्षणाबाबत ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. ओबीसींचे २७ टक्के आरक्षण कायम राहिले पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.(Mahayuti)
यातून कोणीही सुटणार नाही
पुण्यातील जमीन घोटाळ्याच्या चौकशीबाबत ते म्हणाले, “राजेंद्र मुठे समिती अस्तित्वातच नव्हती. स्थानिक समितीने केलेल्या अहवालानुसार प्राथमिक कारवाई केली आहे. आता विकास खारगे यांच्या अध्यक्षतेतील उच्चस्तरीय समितीचा अहवाल निर्णायक ठरेल. व्यवहार रद्द करणे आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ४२ कोटींची नोटीस दिली आहे. यातून कोणीही सुटणार नाही.”(Mahayuti)
साठ लाख कुटुंबांना दिलासा
भाडेकरूंसाठी घेतलेल्या निर्णयाबाबत ते म्हणाले, “रीडेव्हलपमेंटमध्ये ६०० स्क्वेअर फुटांपर्यंत घर मिळाल्यास मुद्रांक शुल्क लागू होणार नाही. तसेच १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंतची तुकडेबंदीतील बांधकामे नियमित करण्यात येणार असून साठ लाख कुटुंबांना याचा फायदा मिळेल.”(Mahayuti)
साडेपाचशे अधिकाऱ्यांना प्रमोशन
महसूल विभागातील दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या पदोन्नत्या मोठ्या प्रमाणात दिल्याचेही बावनकुळे म्हणाले. “नायब तहसीलदार ते अतिरिक्त जिल्हाधिकारी अशा साडेपाचशे अधिकाऱ्यांना प्रमोशन दिले आहे. त्यामुळे आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेण्याची गरज राहणार नाही.”(Mahayuti)
कॉंग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नाही
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवर टीका करताना ते म्हणाले, “वडेट्टीवार–पटोले–केदार यांच्यात समन्वयच नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात असून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. २०२९ मध्ये काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात छोटी पार्टी राहील.”
तसेच उर्दू प्रचार पत्रक, धर्मांतरण व्हिडिओ, शिक्षकांच्या मागण्या आणि सांगलीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या संदर्भातही त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. फ्लॅट नोंदणीसाठी ‘व्हर्टिकल सातबारा’ प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
(Mahayuti)