मुंबई : (Al-Fallah University) दिल्ली स्फोटांचे केंद्रबिंदू बनलेले आणि फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल (व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल) संबंधित फरीदाबादमधील अल-फलाह यूनिवर्सिटीबाबत (Al-Fallah University) दररोज नव-नवे खुलासे होत असतानाच, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणारा मिर्झा शादाब बेग हा सुद्धा अल-फलाह यूनिवर्सिटीचाच (Al-Fallah University) विद्यार्थी होतो. त्यामुळे, गोरखपूर-अहमदाबाद स्फोटांसह देशातील पाच स्फोटांचा संबंध देखील आता अल-फलाह यूनिवर्सिटीशी (Al-Fallah University) जोडला गेला आहे.
सुरक्षा यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कारवायांमध्ये अनेक गोष्टी उघड झाल्या. त्यातच आता २००७ च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटात सहभागी असलेला आणि देशभरात पाच बॉम्बस्फोट घडवण्याचा आरोप असलेला मिर्झा शादाब बेग हा देखील अल-फलाह यूनिवर्सिटीचाच (Al-Fallah University) विद्यार्थी असल्याचं समोर आलयं.
इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य असलेला मिर्झा शादाब बेगने २००७ मध्ये फरिदाबादमधील अल-फलाह अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेकचं (इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन) शिक्षण पूर्ण केलं.त्याच वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्येही त्याचे नाव समोर आले. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो विद्यार्थी असतानाच हल्ल्यांच्या नियोजनात सहभागी होता. तो सध्या फरार असून, अफगाणिस्तानमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. (Al-Fallah University)
मिर्झा शादाब बेग कोण-कोणत्या दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होता?
गोरखपूर स्फोट, २००७
२२ मे २००७ मध्ये संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास गोरखपूरमध्ये ५-५ मिनिटांच्या अंतराने झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये बेगचे नाव सामील आहे. सप्टेंबर २००८ मध्ये इंडियन मुजाहिदीनचा पर्दाफाश झाल्यापासून, मिर्झा शादाब बेग फरार आहे. दिल्ली, जयपूर, अहमदाबाद आणि गोरखपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये देखील त्याचे नाव समोर आल्यानंतर त्याच्या अटकेसाठी १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. (Al-Fallah University)
जयपूर स्फोट, मे २००८
मिर्झा शादाब बेग हा इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा एक प्रमुख सदस्य होता. २००८ च्या जयपूर बॉम्बस्फोटांसाठी स्फोटके गोळा करण्यासाठी तो उडुपीला गेला होता. इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमधील त्याच्या शिक्षणामुळे, बेगला बॉम्ब बनवण्याची माहिती होती, असे म्हटले जाते. (Al-Fallah University)
अहमदाबाद-सुरत स्फोट, जुलै २००८
२००८ मध्ये, गुजरातमधील सुरत येथे स्फोट झाले. बेग त्यामध्ये देखील सहभागी होता. त्याने स्फोटांच्या १५ दिवस आधी अहमदाबादमध्ये जाऊन संपूर्ण शहराची रेकी केली होती. त्याने कयामुद्दीन कपाडिया, मुजीब शेख आणि अब्दुल रझीक यांच्यासह तीन पथके तयार केली. अब्दुल रझीकच्या टीममध्ये आतिफ अमीन आणि मिर्झा शादाब बेग यांचा समावेश होता. बेगने स्फोटांसाठी सर्व व्यवस्था केली आणि स्फोटांपूर्वी, बेगने बॉम्ब तयार करून इतरांना प्रशिक्षण दिले. (Al-Fallah University)
मिर्झा शादाब बेग २००८ पासून फरार
मिर्झा शादाब बेग २००८ मध्ये इंडियन मुजाहिदीन नेटवर्क उघडकीस आल्यापासून फरार आहे. दिल्ली, जयपूर, अहमदाबाद आणि गोरखपूर बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याच्या अटकेसाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो शेवटचा २०१९ मध्ये अफगाणिस्तानात होता पण अजूनही तो सापडलेला नाही आणि आता दिल्ली कार स्फोटानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Al-Fallah University)