मुंबई : ( Super Moon ) बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री आकाशात एक मनमोहक दृश्य पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दिवशी आपल्याला सुपर मून चे दर्शन होणार आहे, या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असून त्याचे रूप अधिक मोठे, तेजस्वी व विलोभनीय दिसणार आहे.
चंद्र त्रिपुरारी पौर्णिमेला ३० टक्के अधिक तेजस्वी असणार...
सामान्यत: चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ किमीच्या अंतरावर असतो परंतु त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री तो दररोजच्या तुलनेने, आकाराने त्याचे बिंब आकाराने १३ टक्के मोठे व ३० टक्के अधिक तेजस्वी दिसणार आहे.
हेही वाचा : सिंधुदुर्गच्या किनारी पुन्हा एकदा दुर्मीळ समुद्री पक्ष्यांची स्वारी
पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर त्यास 'मायक्रो मून' असे म्हणतात. हा सुपर मून सायंकाळी ५:४४ पूर्वेकडे उगवेल आणि संपूर्ण रात्रभर त्याचे हे मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतरही पुन्हा दत्त जयंतीच्या रात्री (४ डिसेंबर २०२५) ला सुपर मून बघायला मिळणार आहे.