पर्यावरणाची वारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात साजरी

02 Nov 2025 15:51:59

Maharashtra Pollution Control Board
 
( उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करताना मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम व सदस्य सचिव एम. देवेंदर सिंग )
 
 
पंढरपूर : ( Maharashtra Pollution Control Board ) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी या वारीचा मुख्य समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे पार पडला.
 
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आता आपण विकासाचे मारेकरी न होता विकासाचे वारकरी व्हा असा बहुमोल संदेश यावेळी दिला, राज्याने मिशन बांबू च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धनात भरीव कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या संकल्पनेतून प्रदूषण नियंत्रणा करता ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याचं तोंड भरून कौतुक एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.
 
त्यांनी मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी घेतलेल्या विविध उपायोजनाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. युनोस्कोचे दर्जा मिळालेले महाराष्ट्रातील अकरा किल्ले यांचे स्वच्छता अभियान, बीच क्लीन अप करिता बॉब केट मशनरी, राज्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड अशा विविध उपयोजनामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढील भविष्यात प्रदूषण नियंत्रणात भरीव कामगिरी करेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
 
 हेही वाचा : धारावीकरांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेला अखेर यश
 
आयोजित केलेल्या वारीच्या कार्यक्रमाला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी मंत्री भरत शेठ भोगावले, गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम, आमदार डॉ. तानाजी सावंत अभिजीत पाटील रवी खरे, समाधान अवताडे, महाराष्ट्र प्रदूषण यंत्र मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सदस्य सचिव एम देवेंदर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
 
या कार्यक्रमाचे स्वागत पर प्रास्ताविक मंडळाचे सदस्य सचिव हेम देवेंदर सिंग यांनी केलं तर मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मंडळ पुढील भविष्यात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून सर्वसामान्य नागरिकांचा प्रदूषण नियंत्रणात सहभाग वाढवण्याबद्दल प्रोत्साहित केले जाईल अशी माहिती दिली. लोककलावंतांच्या माध्यमातून केवळ वारीपुरती जनजागृती न करता संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण विषयक जनजागृती करिता विशेष मोहीम हाती घेतली जाईल याचा उल्लेख देखील कदम यांनी केला.
 
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या पर्यावरण वारीच्या कार्यक्रमात श्रीमती मानसी बडवे यांनी कीर्तन, योगेश चिकटगावकर यांनी भारुड, तर शिवशाहीर प्रवीण जाधव यांनी पोवाडा सादर केला आणि उपस्थितांची मने जिंकून घेतली.
 
 
Powered By Sangraha 9.0