मुंबई : (Suraj Chavan) बिग बॉस मराठीच्या ५ व्या सीझनचा विजेता आणि तरुण पिढीला त्याच्या कंटेंटने पार वेड लावणाऱ्या सुरज चव्हाणने (Suraj Chavan) नुकताच त्याच्या नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला. गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत, अजित पवारांचा खास उल्लेख करत, त्यांने त्यांचे आभार मानले आहेत.
सूरजची अजित दादांसाठी खास पोस्ट
या पोस्टमध्ये सुरजने (Suraj Chavan) लिहिलं आहे कि, "आज केला माझ्या नवीन घराचा गृह प्रवेश, आदरणीय अजितदादा पवार, फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला हक्काचे घर मिळाले. आपण नेहमी माझ्यासारख्या गोरगरीबाच्या मदतीला येता, यापुढे देखील असेच अनेकांच्या मदतीस याल अशी मला खात्री आहे. यात हस्ते परहस्ते मदत करणारेंचे देखील मनःपूर्वक आभार!"
या पोस्टवर अजित पवारांनी कमेंट करत, सुरजला (Suraj Chavan) त्याच्या नवीन घरासाठी आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुरज (Suraj Chavan) गेली बरीच वर्ष त्याच्या साध्याभोळ्या गावरान भाषेत कंटेंट बनवून सोशल मीडियावर टाकत होता. मात्र बिग बॉस मराठी सीझन ५ चं विजेतेपद पटाकवल्यानंतर त्याच नशीबच बदललं. बिग बॉसची ट्रॉफी तर जिंकलीच, पण त्यानंतर केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक या चित्रपटातून सुरज चव्हाणला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी सुद्धा मिळाली.