Nitish Kumar : नितीश कुमार घेणार १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

19 Nov 2025 19:11:33

Nitish Kumar

 
मुंबई : (Nitish Kumar) नितीश कुमार यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे. बुधवार दि. १९ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला.
 

आता नितीश कुमार (Nitish Kumar) पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार हे औपचारिकरित्या जाहीर करण्यात आले आहे. उद्या, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता त्यांचा शपथविधी समारंभ होणार असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व एनडीए नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती माध्यमांकडून मिळत आहे.
 

हेही वाचा :  ITI : कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळासाठी गरजेनुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकवणार - मंत्री मंगल प्रभात लोढा


 
नितीश कुमार (Nitish Kumar) हे यावर्षी १० व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. २००० मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, परंतु बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर सात दिवसांतच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर २००५ मध्ये आरजेडी राजवटीला आव्हान देत, ते प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत परतले.
 

दरम्यान, २०१४ ते २०२४ याकाळात नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अनेक आघाड्या करत सत्तेची स्थापना केली, मात्र जानेवारी २०२४ मध्ये, त्यांनी महाआघाडी सोडली आणि एनडीएमध्ये परतून ९ व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता, २०२५ च्या बिहार निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयासह, ते १० व्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत.
 

हे वाचलात का ? :  Suraj Chavan : गृहप्रवेशानंतर सुरज चव्हाणची अजित पवारांसाठी खास पोस्ट, म्हणाला, फक्त तुमच्यामुळे...


 
नितीश कुमार (Nitish Kumar) दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार!
 

पहिली शपथ: मार्च २०००
दुसरी शपथ: नोव्हेंबर २००५
तिसरी शपथ: नोव्हेंबर २०१०
चौथी शपथ: फेब्रुवारी २०१५
पाचवी शपथ: नोव्हेंबर २०१५
सहावी शपथ: जुलै २०१७
सातवी शपथ: नोव्हेंबर २०२०
आठवी शपथ: ऑगस्ट २०२२
नववी शपथ: जानेवारी २०२४
दहावी शपथ : नोव्हेंबर २०२५
 


Powered By Sangraha 9.0