मुंबई : (Mithi River) मिठी नदी (Mithi River) गाळ उपसा घोटाळा प्रकरणी बुधवार दि.१९ रोजी आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हजर राहून आपला सविस्तर जबाब नोंदवला. या प्रकरणात काही व्यक्तींनी संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार लाड यांनी यापूर्वी केला होता. त्यावर आज त्यांनी पुराव्यांसह ५०३ पानांचे कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांना सुपूर्द केले. पैशांचा व्यवहार कसा झाला याची माहिती त्यांनी, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्या समोर सविस्तरपणे मांडल्याचेही ते म्हणाले. (Mithi River)
आमदार लाड म्हणाले, "येणाऱ्या काळात या घोटाळ्याचे खरे सत्य समोर येईल आणि मुख्य सुत्रधार आणि दोषींना जेलची हवा खावीच लागेल. मुंबईतील मराठी करदात्यांचे पैसे ज्यांनी खाल्ले त्यांना ते फेडावेच लागतील." (Mithi River)
विधान परिषदेत या प्रकरणी एस आय टी स्थापन करण्याची मागणी आमदार लाड यांनी केली होती. (Mithi River)
आमदार लाड पुढे म्हणाले, "मुख्य सूत्रधार कोण आहे हे लवकरच स्पष्ट होईल आणि त्याच्या अटकेची प्रक्रिया आता सुरु होईल. आमचा एकच प्रयत्न आहे, कररूपाने भरलेल्या सामान्य मुंबईकरांच्या पैशाचे रक्षण व्हावे आणि त्यांना न्याय मिळावा." (Mithi River)
"मागील काही वर्षांत २० लाख मेट्रिक टन गाळ काढला असे सांगितले जाते. परंतु हा गाळ काढून टाकला कुठे याचा पुरावा कोणाकडेच नाही. ज्या ठिकाणी जागा दाखवली जाते, तिथे इमारती उभ्या आहेत. परंतु हा गाळ जर एखाद्या भरावाच्या ठिकाणी टाकला असता तर एक नवी मुंबई उभी राहिली असती. परंतु हा प्रकार खोटे बोल पण रेटून बोल असा आहे. त्यामुळे संबधित व्यक्ती कोणीही असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे ही माझी मागणी आहे." असे आमदार प्रसाद लाड यावेळी म्हणाले.