मुंबई : (Anti-drug campaign) मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी अँटी-नार्कोटिक्स अंतर्गत मोठी कारवाई केली असून तेंग्नौपाल जिल्ह्यातील सुमारे १५ एकर बेकायदेशीर अफूची शेती (Anti-drug campaign) नष्ट केली आहे. ही कारवाई तेंग्नौपाल पोलिस स्टेशन अंतर्गत खुडेई खुलेन डोंगररांगेत करण्यात आली. या कारवाईत सुरक्षा दलांनी अफूची (Anti-drug campaign) लागवड करणाऱ्यांनी वापरलेली एक झोपडी पाडली, तात्पुरती सिंचन व्यवस्था हटवली आणि तीन रासायनिक स्प्रे पंप नष्ट केल्याची माहिती आहे. सध्या या बेकायदेशीर कृत्यामागे कोण कोण सहभागी होते यांचा तपास केला जात आहे.(Anti-drug campaign)
ही कारवाई गेल्या आठवड्यात ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ५३० एकरांहून अधिक अफूच्या शेतीचा नाश करण्यात आला, त्यादरम्यान करण्यात आली. आसाम रायफल्स, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), मणिपूर पोलीस आणि अनेक सरकारी यंत्रणा यात सहभागी होत्या. सर्वात मोठी कारवाई उख्रूल जिल्ह्यात झाली, जिथे सोमदल, लमलाई चिंगफेई आणि लीतान डोंगररांगांमध्ये अंदाजे ४३६ एकरांची शेती नष्ट करण्यात आली. लोइबोल खुलेन गावात संयुक्त पथकाने २० एकरांइतकी अफू शेती नष्ट केली आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या मीठाच्या दोन गोण्या जप्त केल्या. अनेक शेतीची साधने, पाईप्स, स्प्रे पंप आणि तणनाशके देखील नष्ट करण्यात आली.(Anti-drug campaign)
हेही वाचा : Mithi River : मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी आमदार प्रसाद लाड यांनी नोंदवला जबाब
कोटलन गावातील दुसऱ्या कारवाईत आणखी २० एकर शेती, पाच झोपड्या, खताच्या तीन गोण्या, तणनाशके आणि मीठाच्या पिशव्या नष्ट करण्यात आल्या. १२ नोव्हेंबरला थोंगलांग अकुट्पा–सोंगजंग आणि ऑलमुन गावाजवळील डोंगराळ भागात ५६ एकरांवरील अफूची शेती उपटून १९ झोपड्या आणि इतर सामग्री नष्ट केली गेली.(Anti-drug campaign) मिळालेल्या माहितीनुसार, कांगपोकपी, उख्रूल आणि सेनापती जिल्ह्यांतील या संयुक्त कारवायांमध्ये एकूण ४८६ एकर बेकायदेशीर अफू शेती (Anti-drug campaign) पाच दिवसांत नष्ट केली गेली. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या नष्ट केलेल्या शेतांमधून ३,३०० किलोहून अधिक अफू तयार झाली असती, ज्याची किंमत कोट्यवधी रूपये झाली असती.(Anti-drug campaign)
२०२० पासून संरक्षण दलांनी ८ हजार एकरांहून अधिक बेकायदेशीर अफू शेती ओळखली असून ज्यापैकी सुमारे १,७०० एकर त्या वर्षीच नष्ट करण्यात आली. कठोर कारवाईमुळे मणिपूरमध्ये अशा शेतीची (Anti-drug campaign) संख्या सातत्याने कमी होत आहे. सुरक्षा आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, मणिपूरमध्ये अफू लागवड ही अनेक वर्षे हिंसाचार, सशस्त्र गटांच्या अर्थपुरवठा आणि चालू असलेल्या जातीय तणावाशी जोडली गेली आहे. अफू शेती आणि ड्रग व्यापारातून मिळणारा पैसा डोंगराळ भागातील अस्थिरतेला आधार देणाऱ्या नेटवर्ककडे जात असल्याचे आढळते. आसाम रायफल्सने अशा व्यापाराविरुद्ध शून्य-सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे आणि यात गुंतलेल्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे.(Anti-drug campaign)