कोलवा - (Housing Federation) स्वयंपुनर्विकास समजून घेऊन सर्व सोसायट्यांनी आपापल्या क्षेत्रात कशा प्रकारे स्वयंपुनर्विकास (Housing Federation) करता येईल यासाठी अभियान सुरु केले पाहिजे. नाशिक, पुणे येथे मोठ्या परिषदा घेतल्या. सर्व शहरांत या योजनेची मोठ्या प्रमाणावर मागणी होतेय. त्यासाठी तेथील हौसिंग फेडरेशनने (Housing Federation) एक समन्वय करणारी यंत्रणा उभी करून महत्वाची भूमिका बजवावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) तथा भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.(Housing Federation)
महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन (Housing Federation) आणि गोवा सरकारच्या सहकार विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज कोलवा येथे शिखर संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी स्वयं/समूह पुनर्विकास विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी लेखक व वक्ते अच्युत गोडबोले, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटसचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भास्कर राणे, मनिषा कोष्टी, श्रीप्रसाद परब, माजी आयुक्त चौधरी यांसह हौसिंग आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Housing Federation)
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले कि, अनेक परिषदा, संमेलने होतात.पण त्यात विषय नसतात. परंतु गोव्यात आयोजित केलेल्या परिषदेत को-ऑपरेटिव्हचा हौसिंगमध्ये रोल काय, को-ऑपरेटिव्ह गव्हर्नन्स व आर्थिकदृष्ट्या कशी सांगड घातली पाहिजे, स्वयं पुनर्विकास आदी विषयांवर चर्चा होत आहे. सामान्य माणसाचे घर होणे हे आयुष्यातील मोठे स्वप्न असते. मी स्वयं पुनर्विकास योजना आणली. ती योजना काही नवीन नाही. मुंबई बँकेने सर्वप्रथम या योजनेसाठी कर्ज धोरण बनविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानग्या मिळविण्यासाठी मदत केली. त्यानंतर हळूहळू या योजनेला गती मिळाली. गोरेगाव येथे आयोजित केलेल्या गृहनिर्माण परिषदेत १८ मागण्या शासनाकडे केल्या. त्यापैकी १६ मागण्यांचे तात्काळ शासन निर्णय करण्याचे काम फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाले. ही योजना सुरळीत होण्यासाठी शासनाच्या निर्णयांचा हातभार लागला व मुंबईत स्वयं पुनर्विकासाचे एक अभियान सुरु झाले. स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईत १८ इमारती उभ्या राहिल्या असून लोकं चाव्या घेऊन मोठ्या घरात राहायला गेले असल्याचेही दरेकर म्हणाले.(Housing Federation)
हेही वाचा : OBC: निवडणूकीमध्ये ओबिसींना २७ टक्के आरक्षणासदंर्भात सुनावणी पुढे ढकलली
दरेकर पुढे म्हणाले कि, नवी मुंबई, ठाणे येथील मनपा क्षेत्रातही स्वयं पुनर्विकास चळवळ पोचलीय. चारकोप येथील चावी वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची घोषणा केली व त्या अभ्यास गटाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. तीन महिने संपूर्ण राज्यात फिरलो. सर्वांशी संवाद साधला, बैठका घेतल्या. सर्व गोष्टींचे नीट आकलन करून सरकारला तीनशे पानांचा अहवाल दिला. सरकारने जसाच्या तसा अहवाल स्वीकारला. माझ्या शिफारशीही मान्य केल्या. त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रीमियमवरील व्याज तीन वर्षासाठी माफ करण्याचीही घोषणा केली. स्वयं/समूह पुनर्विकास (Housing Federation) प्राधिकरणातील समूह ही योजना मुख्यमंत्र्यांची आहे. अशा प्रकारची संवेदना असणारे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले असल्याचेही दरेकर म्हणाले.(Housing Federation)
दरेकर पुढे म्हणाले कि, माझ्या अहवालात प्राधिकरण करण्याची मागणी केली होती. स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण (Housing Federation) करणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य ठरले आहे. कुठल्याही कार्यालयात गर्दी नसेल एवढी गर्दी स्वयं/समूह प्राधिकरणाच्या कार्यालयात असते. ती गर्दी माझ्यासाठी नसते तर लोकांनी स्वयं पुनर्विकास विषय हाती घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर लोकं, संस्था या योजनेसाठी पुढे येत आहेत. स्वयं पुनर्विकास योजना गेम चेंजर असून युवा-महिलांनी सहकारात मोठ्या प्रमाणावर आले पाहिजे. महिला काय करू शकतात याची प्रचिती बिहार निवडणुकीत दिसून आली असून सहकाराला परंपरागत आधुनिकतेची जोड देऊन आपल्याला पुढे जायचे असल्याचेही दरेकरांनी यावेळी म्हटले.(Housing Federation)
चांगले काम करणाऱ्याला मदत होतेच
दरेकर म्हणाले कि, आपण चांगले काम करतोय त्याला समाजाकडून, सरकारकडून आणि विरोधी पक्षाकडूनही मदत होतेय. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या योजनेविषयी माहिती जाणून घेतली. स्वयं पुनर्विकास ही योजना हौसिंगमध्ये गेम चेंजर ठरु शकते असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. त्यामुळे ही योजना गती घेतेय.(Housing Federation)