पाटना : (Rohini Acharya) बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर, आता लालू प्रसाद यादव व रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांच्यातील कौटुंबिक वाद चर्चेत आला आहे. रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी भाऊ तेजस्वी यादव आणि रमीझ यांच्यावर अपमान व शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे व त्याचबरोबर घरही सोडले आहे. रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी घर सोडताच, पाठोपाठ त्यांच्या तीन बहिणी - रागिणी, चंदा आणि राजलक्ष्मी यांनीही आपल्या मुलांसह घर सोडले असून सध्या त्या दिल्लीस रवाना झाल्या आहेत. हा वाद आता फक्त कौटुंबिक वाद राहिलेला नसून त्याने राजकीय पातळीवरही वादाचे रुप धारण केले आहे. (Rohini Acharya)
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वोच्च नेते लालू प्रसाद यादव यांच्या कन्येने (रोहिणी आचार्य) (Rohini Acharya)एक एक्स पोस्ट केली होती, ज्यात त्यांनी कुटुंबाशी असलेला संबंध तोडत असल्याचे आणि राजकारणातील आपले स्थानही सोडत असल्याचे या पोस्टमार्फत जाहीर केले आहे. या सबंध प्रकरणामुळे 'माझ्या आत्मसन्मानाला धक्का लावण्यात आला आहे', असंही त्यांनी नमूद केलं आहे. (Rohini Acharya) या प्रकारामुळे काहींनी स्त्री-मानसिकतेचा मुद्दादेखील उचलला असून, म्हणाले आहेत; या प्रसंगावरुन हे अधोरेखित होते की, 'यादव कुटुंबात पितृसत्तात्मक वृत्तीचा प्रभाव प्रर्खाषाने जाणवतो'.
हेही वाचा : Cloudflare Outage : क्लाउडफ्लेअर आउटेजमुळे X, ChatGPT, Spotify सह अनेक प्लॅटफॉर्मवर परिणाम!
आपल्या वडिलांना किडनी दान केली असल्याकारणाने रोहिणी (Rohini Acharya)यांना सासरकडील मंडळींनीही चक्क 'घाणेरडी' म्हणून संबोधले आहे.
परंतु, या सबंध प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या रोहिणी आचार्य आहेत तरी कोण?
रोहिणी आचार्य (Rohini Acharya) या बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या कन्या आहेत. त्यांच्याकडे वैद्यकीय पदवी आहे आणि लग्नानंतर काही काळ त्या परदेशातही होत्या. २०२४ मध्ये, त्यांनी मुख्य प्रवाहातील राजकारणात प्रवेश केला आणि आरजेडी विरुद्ध सारण येथून लोकसभा मतदारसंघातून पदार्पण केले. त्यांच्या वडिलांना किडनी दान करण्याच्या त्यांच्या उदात्त कृतीसाठी आणि शालीनता, कौटुंबिक अभिमान आणि नम्र राजकीय महत्त्वाकांक्षेच्या प्रवक्त्या म्हणून त्यांना ओळखले जाते होते.(Rohini Acharya) परंतु, २०२५ मध्ये समोर आलेल्या तपशीलाप्रमाणे त्यांनी सर्व राजकीय भूमिकांमधून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर, सक्रिय राजकारणही सोडल्याचे जाहीर केले आहे.(Rohini Acharya)