Dharavi redevelopment: धारावी पुनर्विकासात दहा लाख लोकांना घरे मिळणार धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होणारचं !

19 Nov 2025 19:05:13
(Dharavi redevelopment)
 
मुंबई : (Dharavi redevelopment) आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी (Dharavi redevelopment) विकासाचे नवे आयाम आखण्यास सज्ज आहे. अशावेळी या प्रकल्पाला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून विरोध होत आहे. या विरोधाला न जुमानता लाखो धारावीकरांनी (Dharavi redevelopment) पात्रता निश्चिती प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला. याच पार्श्वभूमीवर ‘महाएमटीबी मुंबई डायलॉग: मुंबई काल,आज आणि उद्या’ या परिषदेच्या निमित्ताने भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद. (Dharavi redevelopment)
 
प्रश्न : धारावी पुनर्विकास प्रकल्पात धारावीतील व्यवसायांचे पुनर्वसन कसे होणार?
 
उत्तर : धारावी  (Dharavi redevelopment) इज वन ऑफ द बिगेस्ट अर्बन रिन्यूअल प्रोजेक्ट्स इन द वर्ल्ड ! जगातील सर्वात मोठ्या या प्रकल्पात दहा लाख लोकांना घर देण्यात येणार आहेत. हा असा प्रोजेक्ट आहे जिथे अपात्र लोकांना सुद्धा घर दिले जाणार आहे. २०२२पर्यंत ज्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत, त्यासर्व लोकांना रेंटल हाऊसिंगमध्ये घर देण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील खास बाब अशी आहे की,धारावीमधील (Dharavi redevelopment) स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी रिडव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये एक छोटेसे हब साकारण्यात येणार आहे. म्हणजे धारावीतील उद्योग हे धारावी  (Dharavi redevelopment) मध्येच राहणार, बाहेर जाणार नाहीत. इनफॅक्ट त्यांना जास्त पोषक अशा प्रकारचं वातावरण त्याठिकाणी निर्माण केलं जाईल.
 
प्रश्न : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध, मेट्रो प्रकल्पांना विरोध. हे विकासकामांना विरोधाचे वातारण आणि हे राजकारण मुंबईला आणि मुंबईकरांना आगामी काळामध्ये मान्य असेल का?
 
उत्तर : मुंबईकरांना हे मान्य आहे की, नाही याचे उत्तर मुंबईकरच आगामी निवडणुकीमध्ये देईल. मुंबईकरांनी ते उत्तर वारंवार दिलेलं ही आहे आणि दोन महिन्यांनी पुन्हा देतील. प्रकल्पांना विरोध दोन कारणांसाठी असतो. एक असतो राजकीय आणि दुसरा असतो वेस्टेज इंटरेस्ट करता म्हणजे मला यातून काहीतरी मिळावं यासाठी विरोध केला जातो. परंतु मुंबईकर सुजाण नागरिक आहेत. हे ज्या मेट्रोला विरोध करत होते ती मुंबईकरांची सर्वाधिक आवडीची आणि बहुचर्चित अशी मेट्रो मार्गिका आहे. जर यांनी कारशेडला विरोध केला नसता तर ही मार्गिका दोन वर्षांपूर्वीच झाली असती. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रो एक्वा लाईन पासून दोन वर्ष परावृत्त ठेवण्याचं काम त्यावेळेला विरोध करणाऱ्यांनी केलं. आता धारावीला विरोध करत आहेत. परंतु, धारावीचे (Dharavi redevelopment) कामही पुढे जाताना दिसते आहे. धारावीचे (Dharavi redevelopment) सुद्धा काम होणार आणि दहा लाख लोकांना घर मिळणार, त्याठिकाणी एक छोटे व्यवसाय आणि आर्थिक केंद्रही तयार होणार आहे. तसेच, तिकडे असणाऱ्या अपात्र लोकांनाही रेंटल हाऊसिंगमध्ये घर मिळेल. (Dharavi redevelopment)
 
प्रश्न : इथे अदानी एक नाव गुजराती नाव आहे म्हणून त्याच्याभोवती सगळे राजकारण खेळायचं. अदानी नको तर तुमच्याकडे पर्याय काय याचे उत्तर नाही. ही राजकीय विकृती नाही का?
 
उत्तर : मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या कंत्राटदानांकडून यांनी पैसे खाल्ले ते मराठी होते का? मग तिकडे पैसे खायला यांना गुजराती कंत्राटदार चालतात. त्यामुळे ह्यात यांचा दुटप्पीपणा आहे, हा ढोंगीपणा देखील आहे. त्यामुळेच आता यांना कोणी ऐकतही नाही. मुंबई शहरामध्ये आणि मुंबईकरांना यांच्या या फेक नरीटीव्ह मध्ये काहीही इंटरेस्ट नाही, हे मुंबईकर येणाऱ्या दोन महिन्यांमध्येच दाखवून देतील. (Dharavi redevelopment)
 
हेही वाचा : Nitish Kumar : नितीश कुमार घेणार १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
 
प्रश्न : विरोधकांचा आरोप करत आहे की, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा धारावीकरांचा नसून बीकेसी वाढवण्याचा घाट आहे. धारावीकरांना बाहेर काढणार आहेत. याकडे तुम्ही कसं बघता?
 
उत्तर :यांची इच्छाच नाही की गरीब माणसाला घर मिळावं. धारावीमध्ये (Dharavi redevelopment) राहणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब माणसाला घर मिळावं म्हणून २०२२ पर्यंत डॉक्युमेंट यांची आहेत त्या सर्वांना अपात्र माणसाला सुद्धा तर घर मिळणार असेल तर विरोधकांच्या पोटात का दुखतंय? त्यामुळे कुठेतरी विरोधक राजकीय आकसापोटी विरोध करतायेत किंवा काहीतरी त्यांना मिळवायचे म्हणून विरोध करत आहेत असे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे याच्यामध्ये धारावीतला (Dharavi redevelopment) गरीब माणूस भरडला जातं आहे. परंतु धारावीतल्या गरीब माणसाला त्याचं हक्काचं घर देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होणार आहे. कुठल्याही प्रकारच्या विरोधाला सरकार जुमानणार नाही. (Dharavi redevelopment)
  
प्रश्न : धारावीकरण डम्पिंग ग्राउंडवर टाकणार या अपप्रचारकडे तुम्ही कसे पाहता?
 
उत्तर : जे अपात्र होते २०११ आणि २०२२च्या मधील ज्यांचे डॉक्युमेंट्स आहेत ते इतर कुठल्याही एसआरएस स्कीममध्ये ते अपात्र आहेत. म्हणजेच त्यांची घर निष्कासित केली जातील आणि त्यांना पर्यायी घरही दिल जाणार नाही. परंतु, अशा लोकांना सुद्धा धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये सामावून घेतलं जात आहे. त्यांना रेंटल हाऊसिंगमध्ये इन्व्हर्ट केलं जातंय. त्यांना मुंबईतच इतर दुसऱ्या ठिकाणी हे रेंटल हाऊसिंग तयार करून त्या ठिकाणी घर देण्याचा काम सरकार करते आहे. त्यामुळे जो व्यक्ती होमलेस होणार आहे किंवा रस्त्यावरती येणार आहे, त्याला रेंटल हाऊसिंगच्या माध्यमातून त्याच्या डोक्यावरील छप्पर देण्याचं काम हे सरकार करत आहे. त्यामुळे या गोष्टीकडे सकारात्मकदृष्टीने पाहणे आवश्यक आहे. (Dharavi redevelopment)
 
प्रश्न : धारावी पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या झोपडपट्टी मुक्त मिशनमध्ये कसा दिशादर्शक असेल?
 
उत्तर : धारावी (Dharavi redevelopment) म्हणजे जगातली किंवा आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी त्याची ख्याती आहे. आता जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी ते जगातलं 'वन ऑफ द बिगेस्ट अर्बन रिन्यूअल मिशन' अशा प्रकारची ख्याती ही धारावीची होत चाललेली आहे. त्यामुळे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे हा प्रवास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे स्वप्न आहे की, प्रत्येक माणसाचं स्वतःचं घर असलं पाहिजे, घरामध्ये वीज असली पाहिजे, पाणी असले पाहिजे आणि शौचालय ही घराच्या आतमध्ये असलं पाहिजे. ते मोदीजींचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक पाऊल उचलले आहे. (Dharavi redevelopment)
 
 
Powered By Sangraha 9.0