दरम्यान, या आउटेजचा (Cloudflare Outage) सर्वात मोठा फटका हा एलोन मस्कच्या मालकीच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X ला बसला आहे. ज्याचा त्रास भारतासह जगभरातील लाखो युजर्सना झाला आहे. आतापर्यंत १०,००० हून अधिक युजर्सनी त्यांच्या तक्रारी नोंदवल्या असून, त्यांच्याकडून फीड्स, वेबसाइट्स, लॉग इन आणि सर्व्हर कनेक्शनमध्ये प्रवेश करण्यात समस्या येत असल्याचे तक्रारींमध्ये सांगण्यात आले आहे. (Cloudflare Outage)
क्लाउडफ्लेअरने (Cloudflare Outage) तपास केला असता, त्यांच्या नेटवर्कमध्ये अनेक सेवांवर परिणाम करणारी "व्यापक समस्या" येत असल्याचे समोर आले आहे. कंपनीने उपाययोजनेचे काम सुरू केले आहे, परंतु तरीही अनेक युजर्सना या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र आता सुमारे ८:२० च्या सुमारास ही सेवा पुर्वरव झाली आहे.
प्रभावित प्लॅटफॉर्म कोणते ? (Cloudflare Outage)
X
Spotify
ChatGPT आणि इतर OpenAI सेवा
Perplexity
Gemini
Canva
Letterboxd
Bet365
लीग ऑफ लीजेंड्स
सेज
डाउनडिटेक्टर (आंशिक आउटेज)
स्नॅपचॅट
Amazon