ठाणे : (Maharashtra Pollution Control Board) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (Maharashtra Pollution Control Board) अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयात पालिकेचा आयुक्त सौरभ राव व पालिकेचे अधिकारी यांच्या समवेत पर्यावरण व प्रदूषण विषयक प्रश्नांबाबत आढावा बैठक घेतली. (Maharashtra Pollution Control Board)
या बैठकीत ठाणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा, वायू प्रदूषण नियंत्रण, स्मशानभूमी परिसरातील पर्यावरणीय मानकांचे पालन, वैद्यकीय घनकचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, सिंगल-युज प्लास्टिकवरील कारवाई आणि कत्तलखान्यांमधून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या अशा सर्व प्रमुख मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला. (Maharashtra Pollution Control Board)
पुढील भविष्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board) व महानगरपालिका यांच्या समन्वयातून प्रदूषण व पर्यावरण विषयक समस्यांबाबत (Maharashtra Pollution Control Board) गतिशील कामकाज केले जाईल असे निर्देश कदम यांनी यावेळी दिले.
आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाण्यातील पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण (Maharashtra Pollution Control Board) विषयक सुधारणा आणखी वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्याच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला.
या बैठकीत पुढील भविष्यात ठाणे शहराला स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी संयुक्त प्रयत्न अधिक बळकट केले जाणार आहेत. (Maharashtra Pollution Control Board) शहरातील सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्यासाठी व सिंगल युज प्लास्टिक मुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, (Maharashtra Pollution Control Board) पालिका यांच्या समवेत माध्यमे आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सिद्धेश कदम यांनी यावेळी सांगितले. पुढील भविष्यात अशाच बैठकांचे आयोजन केले जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Maharashtra Pollution Control Board)