Sadguru Shivkripanand Swami : मंत्रालयात सदगुरु शिवकृपानंद स्वामींचे समर्पण ध्यान योग शिबीर संपन्न

    18-Nov-2025
Total Views |

मुंबई : (Sadguru Shivkripanand Swami) 'वसुधैव कुटुंबकम' या तत्वज्ञानावर आधारित सदगुरु शिवकृपानंद स्वामींच्या (Sadguru Shivkripanand Swami) हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराच्या माध्यमातून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हिमालयातील आठशे वर्षांपूर्वीच्या ध्यानाची दिव्य अनुभूती घेतली. मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित या अध्यात्मिक कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही ध्यानाची अनुभूती घेतली.(Sadguru Shivkripanand Swami)

यावेळी श्री शिवकृपानंद स्वामींच्या (Sadguru Shivkripanand Swami) पत्नी गुरू मां रुचिरा मोडक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, अपर मुख्य सचिव सीमा व्यास, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.(Sadguru Shivkripanand Swami)

"स्वामींच्या (Sadguru Shivkripanand Swami) प्रवचनाच्या माध्यमातून प्राचीन अध्यात्माची अनुभूती मिळते. तसेच या ध्यानयोग संस्काराच्या माध्यमाने तरुणांमध्ये एकाग्रता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन देशात निश्चितच उत्कृष्ट संस्कारित नागरिक घडतील," असा विश्वास मंत्री लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामी(Sadguru Shivkripanand Swami) यांनी तब्बल १६ वर्षे हिमालयात ध्यान साधना केली असून ही ध्यान साधना गुरूच्या आत्म्याने शिष्याच्या आत्म्यावर केलेला एक अध्यात्मिक संस्कार असल्याचे स्वामींनी (Sadguru Shivkripanand Swami) यावेळी स्पष्ट केले. जगभर योग, ध्यानधरणेत सर्व जाती-धर्माची जनता असते. ध्यानामधून सर्वांना समान अनुभूती येते. आपल्या शारिरीक समस्या सोडविण्यासाठी आत्मभाव वृद्धिंगत करा. हे सर्व चित्त, मन किती शुद्ध आणि पवित्र आहे, यावर सर्व अवलंबून आहे. समस्या ओळखून निदान करतो, तोच योग गुरु असून अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग योगातून जातो. स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी आरसा लागतो, तसेच अंतर्मुख होऊन अनुभूती घेतल्याशिवाय देव दिसत नाही. देव म्हणजे विश्व चेतना शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.(Sadguru Shivkripanand Swami)