Marathwada Liberation War : “स्वामी रामानंद तीर्थांचे मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदान अमूल्य’’ — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

17 Nov 2025 17:07:52
Marathwada Liberation War 
 
छ. संभाजीनगर : (Marathwada Liberation War) मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या  (Marathwada Liberation War) लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईत देशभक्तीची जाज्वल्य भावना निर्माण करून महिला व असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना (Marathwada Liberation War) सोबत घेत निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याची मुक्तता साध्य केली. त्यांचे हे योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Marathwada Liberation War)
 
क्रांती चौकातील स्वामी रामानंद तीर्थ (Marathwada Liberation War) यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच ऐतिहासिक कमल तलावाच्या पुनरुज्जीवन कामाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते. (Marathwada Liberation War)
 
हेही वाचा : Water Supply Shutdown : कल्याणमध्ये 9 तास पाणीपुरवठा बंद
 
कमल तलाव पुनरुज्जीवन कार्याबद्दल (Marathwada Liberation War) महापालिका आयुक्त जी. श्रीकांत आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. स्वामी रामानंद तीर्थ (Marathwada Liberation War) यांच्या पुतळ्याचे शिल्पकार निरंजन मडिलगेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष तिकीट खरेदी करून तलाव नागरिकांसाठी खुले झाल्याची घोषणा केली. (Marathwada Liberation War)
 
 
Powered By Sangraha 9.0