Devendra Fadnavis : स्थानिक पातळीवरील युती किंवा आघाड्यांना मोठ्या चित्रात पाहणे योग्य नाही

17 Nov 2025 14:16:34
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत होणारी युती किंवा आघाड्यांना एका मोठ्या चित्रात बघणे अयोग्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये होणाऱ्या संभाव्य युती आणि आघाड्यांवर दिली.
 
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) म्हणाले की, "गावांमध्ये अनेकदा गटातटाचे राजकारण असते. आमचे आणि आमच्या मित्रपक्षांचे खूप पटत असले तरी एखाद्या गावात या मित्रपक्षांचेच नेते एकमेकांचे जानी दुष्मन असतात. त्यामुळे ते वेगळे लढतात. असे सगळ्याच पक्षांमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला काही प्रमाणात स्थानिक निवडणूकांमध्ये असे पाहायला मिळते. त्याकडे फार गांभीर्याने पाहू नये." (Devendra Fadnavis)
 
...तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नाही
 
मुंबईत काँग्रेसने नुकताच स्वबळाचा नारा दिला. यावर बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली किंवा युतीत लढवली तरी फार परिणाम होईल असे वाटत नाही. जोपर्यंत काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला भारताच्या मतदारांची नाडी समजत नाही, त्यांची मानसिकता समजत नाही, जोपर्यंत ते जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांवर राजकारण करत नाही आणि जोपर्यंत ते केवळ सोशल मीडियाचे हवेतले राजकारण करतील तोपर्यंत काँग्रेसला काहीही भवितव्य नाही," (Devendra Fadnavis) अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Bangladesh : बांगलादेशात हाय अलर्ट, शेख हसीना प्रकरणावर आज निर्णय; भारतानेही बॉर्डरवरील सुरक्षा वाढवली!
 
बंडखोरांशी चर्चा करून समाधान करू
 
"सगळ्या पक्षांमध्ये बंडखोरीची समस्या आहे. कारण खूप कालांतराने या निवडणूका होत आहेत. काही ठिकाणी ७ वर्षांनंतर निवडणूका होत आहेत. त्यामुळे साहाजिकच आपण लढायला हवे असे प्रत्येकाला वाटत असून काही प्रमाणात बंडखोरी आहे. पण आमच्या पक्षात जी बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचे समाधान करू," असेही त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
 
पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षात घेतले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात आला आहे. पण तरीसुद्धा मी माहिती घेतली. कालपर्यंत ते विरोधकांसोबत असताना त्यांनी आरोप लावले नाहीत. तोपर्यंत ते चांगले होते. आज आमच्याकडे आल्यावर ते वाईट झाले आहेत. परंतू, या प्रकरणात सगळा तपास झाला असून त्यातून काय समोर आले ते आपण बघितले आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊनच हा निर्णय घेतल्याचे स्थानिक लोकांनी मला सांगितले आहे." (Devendra Fadnavis)
 
बाळासाहेबांच्या प्रखर विचारांवरच चालत राहणार
 
"हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणि देशात हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला. हिंदुत्व हे गर्वाने सांगितले पाहिजे, अशी त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी ते श्रद्धेय आहेत. त्यांच्या प्रखर विचारांवरच आम्ही सातत्याने चालत राहणार आहोत," अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. (Devendra Fadnavis)
 
हे वाचलंत का? : Doctor Terror Module : दिल्ली स्फोटातील आरोपी डॉ. शाहीनच्या तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा!
 
मालेगाव प्रकरणात कडक कारवाई करणार
 
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मालेगाव प्रकरणात कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकारची मानसिकता असलेल्यांची मानसिकता ठेचण्याचे काम सरकार करेल." (Devendra Fadnavis)
 
डबेवाल्यांचा पाठींबा माऊलींचाच आशीर्वाद
 
"डबेवाल्यांनी महायुतीला पाठींबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचे डबेवाले महाराष्ट्र आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य अंग आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास केला जातो. गेले काही काळ आम्ही डबेवाल्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचा विश्वास आमच्यावर आहे. बहुतांश डबेवाले हे वारकरी, माळकरी आणि संस्कारी आहेत. त्यामुळे त्यांचा पाठींबा अत्यंत महत्वाचा आहे. मी त्यांना कुठल्या राजकारणात ओढू इच्छित नाही. त्यांचा पाठींबा मिळाल्यास एकप्रकारे तो माऊलींचाच आशीर्वाद आहे." (Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0