कल्याण : (BJP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली तसं भाजपामध्ये (BJP) इतर पक्षातून इनकमिंगला जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र केडीएमसी हद्दीत दिसून येत आहे. भाजपाचे (BJP) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (BJP) यांच्या पुढाकाराने पक्षात मोठया प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे त्यातच भाजपाचे (BJP) पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत असलेल्या भाजपाचा (BJP) महापौर या दाव्याला अधिक बळकटी मिळत आहे.
भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष या नात्याने रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची जबाबदारी आहे. यापूर्वी 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत विशेषत: कोकण विभागात भाजपा (BJP) महायुतीच्या विजयाचे किंगमेकर ठरत पाच ही जागा त्यांनी निवडून आणल्या. व त्यांनी कोकणात भाजपाची (BJP) ताकद सिध्द केली. चव्हाण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ही आपली खेळी वापरून पुन्हा एकदा किंगमेकर ठरतील असा पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत डोंबिवली मतदार संघातून मतदारांनी चव्हाण यांच्यावर सलग चौथ्यांदा मतदानातून विश्वास दाखविला. आणि चव्हाण चौथ्यांदा आमदार झाले. त्यांनी सुरूवातीला राज्यमंत्री आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री पद भूषविले आहे. 2024 च्या निवडणूकीत चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री पद किंवा मुख्यमंत्री पद दिले जाईल अशा चर्चा शहरात रंगल्या होत्या. मात्र त्यांच्याकडे महाराष्ट्र संघटन पर्व प्रदेश प्रभारी जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर 2025 मध्ये त्यांची पक्षाविषयीची एकनिष्ठा, हाती घेतलेले काम तडीस नेण्याची वृत्ती, दांडगा जनसंपर्क आणि कुशल संघटन कौशल्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती येताच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात केडीएमसीत भाजपाचा (BJP) महापौर बसणार असा विश्वास दृढ झाला. त्यामुळे भाजपाच्या (BJP) पदाधिकाऱ्यांकडून सुरूवातीपासूनच केडीएमसीत भाजपाचा (BJP) महापौर बसणार असा विश्वास व्यक्त केला जात होता.(BJP)
भाजपा (BJP) हा देशातील दीड कोटी सदस्य संख्येचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. जसजशी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येत आहे तसतशी पॅनल पध्दतीला अनूकूल असलेल्या पक्षात इतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी येत आहे. त्यात भाजपामध्ये (BJP) इतर पक्षांतून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपा (BJP) अधिक बळकट होत आहे. गेल्या 25 वर्षात केडीएमसीत शिवसेना आणि भाजपाची (BJP) युती आहे. पण या कालवधीत भाजपाच्या (BJP) वाटयाला एक अपवाद वगळता फारसे महापौर पद आले नाही. दरम्यानच्या काळात शिवसेना दुभंगली. शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपा (BJP) व इतर पक्ष एकत्रित येऊन महायुतीने केंद्रात आणि राज्यात सरकार स्थापन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आल्या असल्या तरी युती होणार की नाही या बाबत अजून कोणतेही स्पष्टता नाही. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा युती व्हावी अशी असली तरी कार्यकर्त्यांना मात्र युती होऊ नये असे वाटत आहे. केडीएमसीत युती झाल्याने सर्वांधिक फटका आजतागायत भाजपाला (BJP) बसला आहे. त्यामुळे आता युती झाली किंवा नाही तरी ही महापौर भाजपाचाच (BJP) बसेल असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरणार का हे पाहावे लागणार आहे.(BJP)