या पुढे भारतात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी अशिक्षित मुस्लिमांना हाताशी न पकडता वैद्यकीय पेशातले सुशिक्षित लोक रोवण्यात येतील. ते आत्यंतिक जिहादी मानसिकतेचे असतील, हे पारखण्यात येईल. आता जे पकडले गेले, सर्व सुस्थितीत असून आर्थिक विवंचनेत नसलेले आणि वैद्यकीय पेशातले असल्याने कोणाला संशय येण्याची शक्यता नसलेले होते. पकडले गेलेल्या मौलवीने सारासार विचार न करता आक्षेपार्ह भित्तिपत्रके लावण्याची घाई केली आणि त्यातून कट उघडकीस आला. त्या अर्धवट, अर्धशिक्षित मौलवीचा उताविळेपणा आडवा आला. यातून एक लक्षात घ्यावे लागेल की, सुशिक्षित मुस्लिमांना दहशतवादी कारवायांमधे गुंतवण्याचे धोरण यापुढे ठरविले जाईल आणि रस्त्यांवर हुल्लडबाजी, हिंदूंच्या धार्मिक यात्रांवर दगडफेक करण्यासाठी अर्धशिक्षित मौलवी आणि अशिक्षित, बेरोजगार तरुण हाती धरले जातील.
दि. १० नोव्हेंबरला भारताची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली. त्याच्या आधीच्या आठवड्यात काश्मीरपासून सुरू होऊन उत्तर भारतात अनेक ठिकाणी विस्फोटक म्हणून वापरता येणाऱ्या ‘अमोनियम नायट्रेट’ या रसायनाचे शेकडो किलोंचे साठे अनेक ठिकाणी पोलिसांनी घातलेल्या धाडींमधून सापडले. त्याचा मागोवा एका ठिकाणी मशिदींच्या भिंतीवर लावलेल्या जिहादी भित्तिपत्रकामधून लागला. ज्या मौलवीने ही पत्रके लावली होती, त्याला अटक करून पोलिसांनी चौकशी केल्यावर कटाचे धागेदोरे उत्तर प्रदेशातून थेट काश्मीर आणि महाराष्ट्रात पुणे-मुंब्र्यापर्यंत पोहोचले. त्या तपासातून ज्या लोकांना अटक झाली, त्यांच्यात प्रमुख्याने सुशिक्षित डॉक्टर लोकांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचा अड्डा फरिदाबाद, उ.प्र.मधील अल-फलाह विश्वविद्यालयात होता. २०१५साली मान्यता मिळालेले हे विश्वविद्यालय खासगी संस्थेचे आहे. त्यातील वैद्यकीय महाविद्यालय या घटनेमुळे आता चर्चेत आले आहे. बॉम्बस्फोटात सामील दहशतवाद्यांपैकी काही डॉक्टर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम करत होते. स्फोटकांची आणि जिहादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन अधिक तातडीने तपासकार्य सुरू असतानाच, बिहारमधील निवडणुकांच्या आदल्या दिवशी हा बॉम्बस्फोट दिल्लीत व्हावा, हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही.
असेही दिसते की, गेल्या दोन वर्षांपासून जिहादी मानसिकतेचे हे सर्व डॉक्टर देशात अनेक ठिकाणी बहुदा एकाचवेळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या दृष्टीने जुळवाजुळव करत होते. अल-फलाह विश्वविद्यालयाच्या रसायन प्रयोगशाळेतून हळूहळू बॉम्ब बनविण्याची साधने जमवत होते. आतापर्यंत त्यांनी सुमारे ३ हजार, २००किलो नुसते अमोनियम नायट्रेट आणि त्याशिवाय इतरही रसायने मागविली असावीत, असा अंदाज आहे. या सर्व दहशदवादी कारवाया एकमेकांच्या सहकार्याने सुरू होत्या. एकाच ठिकाणी सर्व सामग्री जमवून न ठेवता ती अनेक ठिकाणी विखरून ठेवण्याचे शहाणपण त्यांना होते. असे दिसते की, भलामोठा अमोनियम नायट्रेटचा साठा तपासणी करणाऱ्या संस्थांच्या हाती सापडल्यावर उरलासुरला जो काही साठा होता; तो वापरून टाकून जीवावर उदार होऊन दिल्लीतील लाल किल्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या एकाच ठिकाणी भीषण स्फोट घडवून आणण्यात ते लोक यशस्वी झाले, असे दिसते.
सुशिक्षित आणि अशिक्षित
हा स्फोट आणि त्याचे कर्तेकरविते असलेल्या उच्चशिक्षित डॉक्टरांची नावे पुढे आल्यावर काही लोक आश्चर्य व्यक्त करू लागले. त्यांच्यात माजी गृहमंत्री चिदंबरम यांचा समावेश आहे. ही इतकी सुशिक्षित मंडळी, ज्यांनी लोकांचे प्राण वाचवणे अपेक्षित असते, ते लोकांचे निर्दयीपणे प्राण घेण्याच्या कारवायांमध्ये कसे गुंतले? त्यांच्या मते, जिहादी मानसिकता ही अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या माघारलेल्या मुस्लिमांमध्ये लवकर मूळ धरते. विशेषकरून मौलाना लोकांच्या शुक्रवारच्या भाषणांतून होणाऱ्या हिंदू-काफीरविरोधी भाषणांमुळे आणि दहशतवादी कृत्ये करताना मेल्यावर लगेच स्वर्गात पोहोचून 72 हुरांच्यासोबत राहायला आणि स्वगय उपभोग मिळण्याच्या आशेने हे अशिक्षित अथवा अर्धशिक्षित लोक दहशतवादी कृत्ये करायला तयार होऊ शकतील. पण, वैद्यकीय पेशातले, वैज्ञानिक प्रगतीशी परिचित असलेले तरुण असे बहकतील, याचा अंदाज त्यांना आलेला नाही. म्हणून ते असे गैरसमज बाळगताना आढळतात. खरे तर गेली हजार वर्षे मुस्लिमांशी रक्तरंजित संघर्ष करूनसुद्धा हिंदूंनी मुस्लीम मानसिकता समजून घेतली नाही. भारताची फाळणी हा हिंदू समाजाला फार मोठा धक्का होता. फाळणीमागची मुस्लीम मानसिकता तेव्हा लक्षात यायला पाहिजे होती. त्यानंतरही सर्वधर्मसमभाव, सेक्युलॅरिझमच्या बौद्धिक जोखडाखाली आणि हिंदू धर्म आणि परंपरांचा दुस्वास करणाऱ्या साम्यवादी वैचारिक अतिरेक्यांच्या बौद्धिक दबावाखाली सुशिक्षित हिंदू समाज दुर्दैवाने या देशविरोधी विचारसरणीच्या विरोधात मुखर झाला नाही. एकतर त्याने तोंड उघडले नाही, अथवा बोटचेपेपणाच्या वृत्तीतून मिळमिळीत तक्रारी करण्यावर समाधान मानले. हजार वर्षे शेजारी राहून इस्लामचा खोलात जाऊन अभ्यास करणे तर सोडाच, पण अगदी वरवरची, जुजबी माहितीसुद्धा हिंदूंमधील सुशिक्षित वर्गाने करून घेतली नाही. तसेच मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांचे लांगूलचालन करून चार-पाच दशकांत संपूर्ण देशासमोर मोठ्या प्रमाणावर अंतर्गत शत्रूंची पैदास करण्याचे काम ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणविणाऱ्या, तरी आतमधून अत्यंत जातीयवादी असणाऱ्या पक्षांनी केले. अगदी नावेच सांगायची तर, प्रथम काँग्रेस, सर्व प्रकारचे साम्यवादी, नंतर समाजवादी, राजद, डीएमके, तृणमूल आणि बिहारमधे मूळ धरू पाहणारा जनसुराज पक्ष, अशी लांब यादी आहे.
अतिरेकी मानसिकतेचे मूळ
मुस्लीम समाजातील सर्वसामान्य नागरिकातील अतिरेकी मानसिकतेचे मूळ धार्मिक शिकवणुकीत मिळते. ते थेट संस्थापक पै. मोहम्मदांच्या चरित्रापर्यंत पोहोचते. एका प्रतिष्ठित घराण्यात जन्मलेला, नीतिमान, सचोटीचा म्हणून ओळखल्या जाणारा, आईवडिलांच्या छत्राला बालपणीच पारखे झालेला, पण अत्यंत कर्तबगार काकांच्या प्रेमळ छायाछत्राखाली वाढलेल्या या तरुणाशी अत्यंत प्रतिष्ठित विधवेने स्वतः मागणी घालून लग्न केले. काही वर्षांनी त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. तो स्थानिक परंपरेच्या विरोधात जाऊन धर्मप्रचार करतो. इथून त्याला सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागते. जोवर त्याचे काका आणि पत्नी जिवंत असतात, तोवर त्याला शारीरिक इजा करण्यास लोक धजत नाहीत. हेही लक्षात घेतले पाहिजे. ती दोन्ही छत्रे गेल्यावर पै. मोहम्मदांनी मक्केतून मदिनेला पलायन केले. यानंतरचे आयुष्य चढ-उतार जय-पराजयांच्या मालिकांचे आणि अत्यंत धोरणी धर्मसंस्थापकाचे आहे. ज्याला इंग्रजीत ‘दि रेस्ट इज हिस्टरी’ म्हणतात, असा इस्लाम प्रसाराचा इतिहास आहे.
बालपणापासून अन्यायाचा ठसा
कोणत्याही मुस्लीम व्यक्तीशी संभाषण करायला सुरुवात झाली, तो ठरवून किंवा अनाहुतपणे एका मुद्द्यावर येतोच. तो मुद्दा पै. मोहम्मदांनी मक्केच्या वास्तव्यात सोसलेल्या अनन्वित छळाचा! त्या अनन्वित छळाचे ओझे ती व्यक्ती आजही वाहते. त्यासाठी प्रत्येक मुसलमान त्या काळातील मक्केतील इतर सर्व गैरमुस्लिमांना-काफिरांना, अनेकेश्वरवादी मुश्रिकांना आणि मदिनेला आल्यावर ज्यांनी मुस्लीम धर्म तर स्वीकारला, पण नंतर दगाबाजी करून त्याचा त्याग केला, त्या लोकांना-मुनाफिकांना जबाबदार धरते. त्याचा राग, विद्वेष आणि तिरस्कार आजच्या गैरमुस्लिमांवर निघतो. त्या मानसिकतेला प्रस्तुत लेखक ‘काफिरोफोबिया’ म्हणतो. ऐतिहासिक काळात ‘जिहाद’ पुकारून केलेल्या लढाया आणि आजच्या काळात अतिरेकी कारवायांद्वारे तो व्यक्त होतो. त्यात नेहमीच कुठल्याही प्रकारे इस्लामविरोधी कारवायात नसलेल्या निर्दोष लोकांचा बळी जातो.
हे पै. मोहम्मदांवरील अन्यायाचे ओझे त्याच्यावर बालपणापासून लादले जाते. सर्वसाधारण मुस्लीम कुटुंबात अगदी बालपणात धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात होते. मुलामुलींना मदरशात शिकवणीसाठी पाठवण्याचा सार्वत्रिक प्रघात आहे. जर कुटुंब सुस्थितीत असेल, तर घरच्यांच्या नजरेखाली मौलवींना शिकवणी देण्यासाठी घरी बोलावतात. हे मौलवी धार्मिक शिकवणीच्या नावाखाली काफीर आणि दगाबाज लोकांच्या नावाने गैरमुस्लिमांच्या बाबतीत द्वेषाचे बीजारोपण बालमनावर करतात. ती बीजे मानात खोलवर रूजली जातात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा बालमनावर रूजवला जातो. तो म्हणजे अगदी पै. मोहम्मदांच्या काळापासून मुसलमांनांवर बाकीचे जग अन्यायच करत आले आहे. हा छळ मुस्लीम जमात धर्मस्थापनेच्या काळापासून ते भोगत आली आहे. त्या छळाचे परिमार्जन करत राहणे, हे त्यांचे आद्य कर्तव्य ठरते. यालाच ‘बळीचा बकरा’ असा आविर्भाव आणणे अथवा ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळणे म्हणतात. कुराणातील अनेक निर्देशांप्रमाणे अल्ला काफिरांचा कधीही कैवारी होणार नाही. काफीर कितीही सच्छील, नेक इन्सान असला तरी त्याने जर अल्लाला मानले नाही आणि पैगंबरांचा शेवटचे देवदूत म्हणून स्वीकार केला नाही, तर मरणोपरांत त्याला नरकात अनंतकाळ शिक्षा भोगावी लागेल. त्याचा उत्तरार्ध म्हणजे काफिरांचे अस्तित्व नाकारणे ठरतो. त्यावर सहृदय मुस्लीम व्यक्तीकडे उपाय असतो. तो म्हणजे संपर्कात आलेल्या काफिराला मुस्लीम धर्म स्वीकारण्याचे आवाहन करणे. तेही सच्चा मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य ठरते. मला मुस्लीम धर्म स्वीकारावा, असे आवाहन अगदी पहिल्या भेटीत करणारे सुशिक्षित मुस्लीम भेटले आहेत. त्या सुशिक्षितांची धर्मनिष्ठा जिहादी मानसिकतेकडे सहज वळू शकते, हे सांगायला नकोच.
एकाच माळेचे मणी
जे पुरुषांच्या बाबतीत घडते, तेच महिलांच्या बाबतीत घडलेले असते. बालपणापासून त्यांनाही जे घार्मिक शिक्षण मिळते, त्यात काफीरद्वेषी ‘काफिरोफोबिया’ची मानसिकता आपोआपच वाढीस लागते. मुलींच्या धार्मिक शिक्षणावर मुस्लीम समाजात अधिक भर असतो. त्यांना धाकात ठेवले जाते. कुठलीही धार्मिक आगळीक घडली, तर कौटुंबिक स्तरावर त्यांना कठोर शिक्षा करण्यात येते. अशा मानसिकतेतून वाढलेली शाहीन सईद ही डॉक्टर असली तरी अतिरेकी कारवायांत गुंतली जाणे यात नवल वाटू नये. ती काफीरविरोधी मानसिकतेने भारली गेली असल्याने घटस्फोट घेऊन त्या कामात झोकून दिल्यानंतर तिला आपल्या मुलांशी एकदाही संपर्क करावासा वाटला नाही, अशी माहिती मिळाली आहे. याबाबतीत मुस्लीम स्त्री आणि पुरुष एकाच माळेचे मणी ठरतात. दहशतवाद्यांचे काम अगदी शेजाऱ्यांनाही कळत नाही. कुटुंब आणि शेजारपाजाऱ्यांसाठी या दहशतवादी व्यक्ती सुस्वभावी, पण अलिप्त असतात. त्यांच्या कारवाया दूर असणाऱ्या कुटुंबीयांना माहीत असण्याची शक्यता कमीच असते. ते कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असते.
कोण कशासाठी उपयुक्त?
या पुढे भारतात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी अशिक्षित मुस्लिमांना हाताशी न पकडता वैद्यकीय पेशातले सुशिक्षित लोक रोवण्यात येतील. ते आत्यंतिक जिहादी मानसिकतेचे असतील, हे पारखण्यात येईल. आता जे पकडले गेले, सर्व सुस्थितीत असून आर्थिक विवंचनेत नसलेले आणि वैद्यकीय पेशातले असल्याने कोणाला संशय येण्याची शक्यता नसलेले होते. पकडले गेलेल्या मौलवीने सारासार विचार न करता आक्षेपार्ह भित्तिपत्रके लावण्याची घाई केली आणि त्यातून कट उघडकीस आला. त्या अर्धवट, अर्धशिक्षित मौलवीचा उताविळेपणा आडवा आला. यातून एक लक्षात घ्यावे लागेल की, सुशिक्षित मुस्लिमांना दहशतवादी कारवायांमधे गुंतवण्याचे धोरण यापुढे ठरविले जाईल आणि रस्त्यांवर हुल्लडबाजी, हिंदूंच्या धार्मिक यात्रांवर दगडफेक करण्यासाठी अर्धशिक्षित मौलवी आणि अशिक्षित, बेरोजगार तरुण हाती धरले जातील. स्थानिक पोलिसांना स्थनिक मौलवी आणि मुस्लीम तरुणांवर लक्ष ठेवावे लागेल आणि अंतर्गत सुरक्षा विभागांना सुशिक्षितांवर. एकूणच, मुस्लीम समाज संशयाच्या घेऱ्यात येईल. हे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने देशासाठी चांगले नाही. यावर मुस्लीम समाजाने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
- डॉ प्रमोद पाठक
9975559155
(उत्तरार्ध वाचा पुढील रविवारच्या अंकात...)