मुंबई : ( Maharashtra State Road Transport Corporation ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) शाळा व महाविघालयीन विद्यार्थ्यांसाठी खुशखबर. शाळा व महाविघालयीन सहलीसाठी ५० टक्के सवलत, तर विद्यार्थ्यांसाठी दररोज ८०० ते १००० बसेस उपलब्ध करूण देण्याची घोषणा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून करण्यात आली आहे.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या सहली काढल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विचार करत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परवडणारा आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी भाड्यात ५० टक्के सवलत दिली आहे. या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस डेपोमधून शाळा आणि महाविद्यालयांना दररोज सुमारे ८०० ते १००० नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
हेही वाचा : Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पात ३२१ किलोमीटर एलिव्हेटड मार्ग पूर्ण
दरम्यान, माहिती प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी राज्य सरकार शालेय सहलींच्या एकूण भाड्यात ५० टक्के सूट देणार आहे. त्याचबरोबर, नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत एमएसआरटीसीने शैक्षणिक सहलींसाठी १९,६२४ बसेस पुरवल्या होत्या, ज्यामुळे राज्य परिवहन मंडळाला ९२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.