Maharashtra Folk : गुजरातमध्ये घुमणार महाराष्ट्राच्या लोककलेचा आवाज

16 Nov 2025 14:14:23

Maharashtra Folk
 
मुंबई : (Maharashtra Folk) सर्व लोककलासाठी, लोककला सर्वांसाठी! हे ब्रीद घेऊन जगणाऱ्या मुंबईच्या विश्व लोककला मंचाचे तरुण कलावंत गुजरात दौऱ्याला निघाले आहेत. गुजरातमधील सर्वात मोठा अभिव्यक्ती सिटी आर्ट्स प्रोजेक्ट पर्व ७ मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या लोककलांचं सादरीकरण होणार आहे. आणि ते सादर करण्याची संधी विश्व लोककला मंचला मिळाली आहे. ‘लोककला दर्शन’ या कार्यक्रमातून ते महाराष्ट्राच्या लोककला (Maharashtra Folk) परंपरा, लोकसंस्कृती, लोकवारसा आणि लोककलांचं दर्शन गुजरात मधील प्रेक्षकांना घडवून देणार आहेत. गण, वासुदेव, पोतराज, गोंधळ सारख्या विविध पारंपरिक लोककलांचा समावेश असलेल्या लोककला दर्शन कार्यक्रमात एकूण चौदा कलावंतांचा सहभाग असणार आहे. तसेच संबळ, हलगी, ढोलकी, ढोल, टाळ, मंजिरी, चिपळ्या, संवादिनी, तूनतूनं, चंडा सारखे पारंपरिक वाद्यांचाच नाद या कार्यक्रम गुंज घालणार आहे. (Maharashtra Folk)
 
हेही वाचा :  लोकपरंपरेचा अद्भुत गौरव : गोंधळ
शिवाय लोककला (Maharashtra Folk) या दृकश्राव्य कला आहेत त्यामुळे फक्त ऐकताच पारंपरिक नाही तर दिसायलाही पारंपरिक दिसायला हवे म्हणून सगळ्या लोककलांचं सादरीकरण त्या त्या पारंपरिक वेशभूषा आणि रंगभूषा करूनच सादर करणार आहेत. त्यामुळे गुजरात मधील प्रेक्षकांना नेमक्या पारंपरिक पद्धतीच्या लोककलांचा आस्वाद घेता येईल. विश्व लोककला मंचचा ‘लोककला दर्शन’ (Maharashtra Folk) हा कार्यक्रम गुजरातच्या विविध शहरात सादर होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचा (Maharashtra Folk) नाद अखंड गुजरातमध्ये गडगडणार आहे. ‘लोककला दर्शन’ या कार्यक्रमाची संकल्पना आणि याचं लेखन, दिग्दर्शन सुरज खरटमल याने केले आहे. तसेच जगदीश कन्नम, मंगेश शिंदे, निभा झेमसे, निखिल घोंगडे, दीपेश कातळकर, यश खडे, श्रीधर बंडगे, सिद्धार्थ कासारे, वेदांत जाधव, भाग्यश्री म्हात्रे, जॉय भांबळ, तुषार गायकवाड, विराज भाटकर असे एकूण चौदा कलावंत गुजरातच्या दौरात सहभागी झाले आहेत. विश्व लोककला मंचचे कलावंत म्हणतात आम्ही आमच्या गुजरात दौऱ्यातून आपल्या महाराष्ट्राच्या लोककलांचा नाद गुजरातच्या भूमीत नेऊन आपली लोकसंस्कृती साजरी करू. (Maharashtra Folk)
 
 
Powered By Sangraha 9.0