Navnath Ban : विजयाचे ढोल बिहारमध्ये, कानठळ्या मात्र मुंबईत; नवनाथ बन यांचे विरोधकांवर टीकास्त्र

15 Nov 2025 16:31:12
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) विजयाचे ढोल बिहारमध्ये वाजले, कानठळ्या मात्र, मुंबईत बसल्या, अशा शब्दात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी विरोधकांवर टीका केली. बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालावर सामना वृत्तपत्रातील अग्रलेखाला त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले.
 
नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, "बिहारमध्ये विधानसभा विजयाचे ढोल-नगारे वाजल्यामुळे इथे मुंबईत काही जणांच्या कानठळ्या बसल्या आहेत. सामना अग्रलेखातून निवडणूक आयोगावर खापर फोडणार्‍यांनो, थोडा इतिहास वाचा आणि थोडा बुध्दीला ताण द्या. निकालाच्या धक्क्याने तुम्ही विस्मरणात गेला असाल तर आठवण करून देतो. २०१० ची बिहार निवडणूक आठवते का? केंद्रात काँग्रेस सरकार होते आणि बिहारमध्ये एनडीए २०६, महागठबंधन २५ आणि अन्य ८ असा निकाल आला होता. तेव्हा कुठे गेला होता तुमचा आजचा ‘आयोगद्रोह’? तेव्हा तर मतदारांनी ३३ च्या आत विरोधकांना गुंडाळले होते. त्यामुळे पराभवाची कारणे तरी जनतेला पटतील अशी सांगा," असे ते म्हणाले. (Navnath Ban)
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : जो जिता वही सिकंदर; पराभव झाल्यानंतर तो स्विकारता आला पाहिजे
 
बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारून मंगलराजाला मत दिले
 
“आजचा अग्रलेख वाचल्यानंतर लक्षात येते की, तुम्हाला खरंच आरामाची सक्त गरज आहे आणि त्याहून जास्त आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे. बिहारच्या जनतेने जातीवाद, जंगलराज नाकारले आणि मंगलराजला मते दिली. आता मुंबईसह महाराष्ट्रातील निवडणुकीत जनता तुम्हाला पुन्हा एकदा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. बिहार तो झांकी है मुंबई अभी बाकी है,” असेही नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0