मुंबईकरांसाठी मोठी बातमी! रविवारी 'या' स्थानकांवर ५ तासांचा मेगाब्लॉक

15 Nov 2025 15:06:59

Mumbai Local
 
मुंबई : ( Mumbai Local Megablock Update ) मुंबईकरांसाठी मोठी बातमी, जर तुम्ही लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे. रविवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी रेल्वेकडून मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्रल यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
 
हेही वाचा : Explosion in J&K's Nowgam : दिल्लीनंतर आता जम्मू-काश्मीर पोलीस ठाण्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
 
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक हा सीएसएमटी ते विघाविहार स्थानकादरम्यान असणार आहे. त्यामुळे, याकाळात करी रोड, चिंचपोकळी आणि मस्जिद बंदर या स्थानकांवर लोकल थांबणार नाही. तर, सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या मेगाब्लॉकची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0