‘महाएमटीबी-मुंबई डायलॉग विथ् अमीत साटम’ मुंबईकरांचा भाजप मुंबई अध्यक्षांशी मुक्तसंवाद

15 Nov 2025 12:28:55

MahaMTB-Mumbai Dialogue

मुंबई : ( MahaMTB-Mumbai Dialogue ) मुंबई हीच अस्मिता मानणार्‍या आणि मुंबईविषयी जिव्हाळ्याने विचार करणार्‍या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे वैचारिक मंथन व्हावे आणि त्यासाठी एक प्रतिष्ठित व व्यापक व्यासपीठ म्हणजे दै. ‘मुंबई तरुण भारत’आयोजित ‘महाएमटीबी-मुंबई डायलॉग.’ भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम या पहिल्यावहिल्या ‘महाएमटीबी-मुंबई डायलॉग’ प्रमुख वक्ते आहेत.
 
सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, ‘कॅमलिन कोकायू’चे कार्यकारी संचालक श्रीराम दांडेकर, ‘कालनिर्णय’च्या कार्यकारी संचालक शक्ती साळगावकर, ‘शिल्प असोसिएट्स’चे सीईओ निखील दिक्षित, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी, ‘एबीपी माझा’च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर यांच्यासह मुंबईचा जिव्हाळ्याने विचार करणार्‍या विशेष निमंत्रित मुंबईकरांसोबत दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत परळच्या ‘आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल’, मुंबई येथे पार पडणार आहे.
 
मराठीतील नंबर १ न्यूज चॅनेल आणि नंबर १ वेबसाईटसह सर्वदूर पोहोचलेले ‘एबीपी माझा’ हे ‘महाएमटीबी-मुंबई डायलॉग’चे टेलिव्हीजन पार्टनर आहेत, तर ‘विवेक-पार्क फाऊंडेशन’चे युनिट ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ नॉलेज पार्टनर म्हणून लाभले आहेत.
 
पहिल्या ‘महाएमटीबी-मुंबई डायलॉग’मध्ये मुंबईचे राजकारण, अर्थविश्व, लोकजीवन, पायाभूत सुविधा, पर्यावरण, आरोग्य, संगीत संस्कृती आणि मनोरंजन या संपूर्ण पैलूंना स्पर्श करणार्‍या मुद्द्यांसोबत मुंबईबद्दलचे भारतीय जनता पक्षाचे व्हिजन काय, मुंबईकरांच्या रोजच्या समस्यांवर भाजपकडे उत्तर काय, याचे मंथन करणारा हा संपूर्ण मुक्तसंवाद मुंबईविषयी कळकळ असणार्‍या आणि मुंबईच्या भविष्यवेधाचा विचार करणार्‍या विशेष निमंत्रितांसोबत आयोजित करण्यात आला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘एबीपी माझा’ आणि ‘महाएमटीबी युट्यूब चॅनेल’ आणि ‘फेसबुक पेज’वर होणार आहे. शिवाय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे हे करतील.
 
 
Powered By Sangraha 9.0