Revised Distribution Area Scheme : संशोधित वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी!

Total Views |
 
Revised Distribution Area Scheme
 
नवी दिल्ली : (Revised Distribution Area Scheme) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांची शुक्रवार दि. 14 रोजी नवी दिल्ली येथे भेट घेत पायाभूत सुविधांच्या संशोधित वितरण क्षेत्र योजनेसाठी (आरडीएसएस) (Revised Distribution Area Scheme) महाराष्ट्राला 2655 कोटी रुपये देण्याची मागणी केली. (Revised Distribution Area Scheme)  लवकरच हा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सोबतच 8000 मेगावॅट तास क्षमतेच्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पासाठी (Revised Distribution Area Scheme) व्यवहार्यता तूट निधी देण्यासाठी सुद्धा सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले. (Revised Distribution Area Scheme)
 
हेही वाचा : Bihar Assembly Election Result 2025 : बिहार निवडणूक निकाल – एक्झिट पोलही ठरले अचूक
 
नवीनीकरणीय ऊर्जा प्रकल्पात (Revised Distribution Area Scheme) निर्माण झालेली अतिरिक्त वीज बॅटरी स्टोरेज साठवून कमाल मागणीच्या वेळी ती वापरली जाते. यात 4500 मे.वॅ. तास क्षमतेच्या अशा प्रकल्पासाठी (Revised Distribution Area Scheme) केंद्राने यापूर्वीच व्यवहार्यता तूट निधी मंजूर केला आहे. त्याच्या निविदाही जारी करण्यात आल्या आहेत. आता अशा प्रकारचा 8000 मे.वॅ. तास क्षमतेचा आणखी एक प्रकल्प महावितरण उभारत आहे. (Revised Distribution Area Scheme) त्यासाठी व्यवहार्यता तूट निधी देण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, असे मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले. सौर ऊर्जा पारेषण जाळ्यातून नेण्यासाठीचे प्रकल्प, राज्यातील 18 मोठे सौर प्रकल्प, ग्रीडच्या तांत्रिक अडचणींवर उपाय अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. या बैठकीत महाराष्ट्रातर्फे ऊर्जा क्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची (Revised Distribution Area Scheme) माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Revised Distribution Area Scheme) यात संसाधन पर्याप्तता आराखडा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (बीईएसएस), पंपस्टोरेज प्रकल्प इत्यादींचा त्यात समावेश होता. (Revised Distribution Area Scheme)
 
या बैठकीत केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, एनटीपीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुरुदीपसिंग आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Revised Distribution Area Scheme)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.