Bharat Book : चरित्र आणि चारित्र्य दोन्हींमध्ये भारताचा इतिहास श्रेष्ठ : डॉ. सदानंद मोरे

15 Nov 2025 16:23:13
 
Bharat Book
 
मुंबई : (Bharat Book) आपल्या भारत (Bharat Book) देशाला प्राचीन आणि समृद्ध इतिहास लाभला आहे. आपण इतिहासाकडे नजर टाकली तर आपल्याला असे दिसून येईल की चरित्र आणि चारित्र्य या दोन्ही गोष्टींमध्ये भारताचा इतिहास श्रेष्ठ आहे." (Bharat Book) असे मत संतसाहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. हर्षद माने लिखित ' भारत' (Bharat Book) या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान ते बोलत होते. या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " प्राचीन काळी अनेक वेगवेगळी साम्रज्यं उदायाला आली, मात्र त्यांची स्थिती आज काय आहे? भारत देश आपला सांस्कृतिक वारसा जतन करत भविष्यात यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. भारत या पुस्तकामध्ये (Bharat Book) केवळ ऐतिहासिक कालखंड न मांडता, भारताच्या  (Bharat Book) इतिहासाचा सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाने सुद्धा मागोवा घेण्यात आला आहे आणि ही गोष्ट अत्यंत स्तुत्य आहे." (Bharat Book)
 
हेही वाचा : Ghazalnawaz Bhimrao Panchale : गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
 
दि, १५ नोव्हेंबर रोजी प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदिर येथे हर्षद माने लिखित ' भारत' या पुस्तकाचा (Bharat Book) प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. (Bharat Book) ज्येष्ठ पत्रकार विनायक परब, म्युझियम सोसायटी ऑफ मुंबईच्या उपाध्यक्षा डॉ. अनिता राणे कोठारे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ. मंजिरी भालेराव आदी मान्यवर सुद्धा उपस्थित होते. (Bharat Book)  यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सरखेल रघुजीराजे आंग्रे म्हणाले की " आपण सगळेच एका समृद्ध इतिहासाचे वाहक आहोत. आपल्याला जर आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपला इतिहास शुद्ध आणि स्पष्ट रुपात लिहीला गेला पाहिजे." पुस्तक (Bharat Book) प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.  (Bharat Book) यामध्ये ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांनी युद्धशास्त्र, त्यामागील अर्थकारण आदी गोष्टींवर भाष्य केले. डॉ. अनिता राणे कोठारे यांनी महाराष्ट्रातील कातळशिल्पं, स्थापत्यशास्त्राचे आविष्कार या विषयावर आपले विचार मांडले. डॉ. मंजिरी भालेराव यांनी शिलालेखांमधला भारत उलगडून सांगितला. (Bharat Book)
 
 
Powered By Sangraha 9.0