Explosion in J&K's Nowgam : दिल्लीनंतर आता जम्मू-काश्मीर पोलीस ठाण्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी

15 Nov 2025 12:42:51

Explosion in J&K

 
मुंबई : (Explosion in J&K's Nowgam) श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या भीषण स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. दिल्ली कार स्फोटानंतर तपास यंत्रणांकडून या स्फोटाशी निगडित दहशतवादी मॉड्यूल नष्ट करण्यासाठी देशभरातील अनेक राज्यांमध्ये करवाई आली आणि अमोनियम नायट्रेटसह सुमारे २,९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. (Explosion in J&K's Nowgam)
 

अधिकाऱ्यांनी माध्यमाना दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.२० वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला, ज्यामुळे पोलीस ठाण्यात मोठी आग लागली. हा स्फोट एवढा भीषण होता की, याचा आवाज सुमारे ३० किमीपर्यंत ऐकू गेला होता. या स्फोटात पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक गाड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. (Explosion in J&K's Nowgam)
 

दरम्यान, या स्फोटाची भीषणता एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यांदरम्यान सुमारे २,९०० किलो बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आणि तपासाचा भाग म्हणून श्रीनगरमधील नौगाम पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. या स्फोटकांची तपासणी करत असताना हा स्फोट झाला आहे. यात २७ पोलिस कर्मचारी, २ महसूल अधिकारी आणि ३ नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Explosion in J&K's Nowgam)
 

 
Powered By Sangraha 9.0