Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर कोणचा असणार?, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, "मुंबईचा महापौर..."

15 Nov 2025 15:42:33

Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातच काँग्रेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. तर, आता विरोधी पक्षांकडून महायुतीचा महापौर कोणाचा होणार? महापालिका निवडणुकीत महायुतीची नेमकी भूमिका काय असणार? एकत्र लढणार की स्वबळावर निवडणुका होणार? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टच सांगितले आहे.
 
हेही वाचा :  मुंबईकरांसाठी मोठी बातमी! रविवारी 'या' स्थानकांवर ५ तासांचा मेगाब्लॉक
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले कि, "मुंबईचा महापौर भाजपचाच असेल असे कोणीही म्हटलेले नाही, तो महायुतीचाच असेल, त्यामूळे आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका."
 
Powered By Sangraha 9.0