Shri Narayan Mahayagna : श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी श्रीनारायण महायज्ञाचे आयोजन

14 Nov 2025 17:51:22
 
Shri Narayan Mahayagna
 
मुंबई : (Shri Narayan Mahayagna) श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त व्हावी या उद्देशाने दि. १५ व १६ नोव्हेंबर रोजी जांबोरी मैदान, वरळी येथे श्रीनारायण महायज्ञ (Shri Narayan Mahayagna) आयोजित करण्यात आला आहे. यावेळी देशविदेशातून साधुसंत येणार असून दुसऱ्या दिवशी हिंदू संमेलन होणार संपन्न होणार आहे. अशी माहिती श्रीकृष्ण जन्मभूमि संघर्ष न्यासचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश शर्मा फलाहारी यांनी दिली. शुक्रवारी प्रेस क्लब मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. (Shri Narayan Mahayagna)
 
हेही वाचा : एनडीएच्या विजयाबद्दल रविंद्र जडेजाच्या पत्नीने केलं बिहारच्या जनतेचं अभिनंदन! काय म्हणाल्या रिवाबा जडेजा?
 
दिनेश शर्मा फलाहारी यावेळी म्हणाले, सर्व सनातनी हिंदूंना माहीत आहे की मुघलांनी तलवारीच्या जोरावर श्रीकृष्ण जन्मभूमीवर अनधिकृत ताबा मिळवला होता. परंतु आम्हा सर्व सनातनींना श्रद्धा आहे आणि न्यायालयावर विश्वास आहे की न्यायालयाच्या सहकार्याने आणि आपल्या विचारांच्या व शब्दांची ताकद वापरून ही लढाई निश्चितच जिंकू. हा यज्ञ (Shri Narayan Mahayagna) महाराष्ट्राच्या वीरभूमीवर होत असून आम्ही भगवान श्री विष्णूंच्या चरणी श्रीकृष्ण जन्मभूमी लवकरच मुक्त होण्यासाठी प्रार्थना (Shri Narayan Mahayagna) करत आहोत.
 
श्रीनारायण महायज्ञ (Shri Narayan Mahayagna) हे देशभरात विविध ठिकाणी यापूर्वी संपन्न झाले आहेत. वरळी येथे होत असलेल्या महायज्ञ (Shri Narayan Mahayagna) व हिंदू संमेलनास राज्याचे विविध आमदार तसेच मंत्र्यांना निमंत्रित केले आहे. त्याच बरोबर साधुसंत देखील मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित राहतील. (Shri Narayan Mahayagna)
 
 
Powered By Sangraha 9.0