Bihar Election Results 2025 : पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं अभिनंदन

14 Nov 2025 20:36:19

मुंबई : (PM Narendra Modi on Bihar Assembly Election Result 2025) बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि. १४) रोजी जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्ष, जनता दल युनायटेड, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) या प्रमुख पक्षांच्या एनडीएने दोनशेचा आकडा पार करत महागठबंधनला धक्का दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार, हे निश्चित झाले आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या मोठ्या आघाडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर नेत्यांचे अभिनंदन केले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

त्यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिले की, "एनडीएनं राज्यात सर्वांगीण विकास घडवून आणला. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि राज्याला नवीन उंचीवर नेण्याचा दृष्टिकोन पाहून लोकांनी आम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे. या मोठ्या विजयासाठी मी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीए कुटुंबातील सहकारी चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचे मनापासून अभिनंदन करतो."


भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. भाजप, जेडीयू आणि लोजपा यांचा समावेश असलेल्या एनडीएनं २००हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर आरजेडी आणि काँग्रेस यांचा समावेश असलेलं महागठबंधन ३५ च्याच आसपास राहिल्याचे दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0