लाडक्या बहि‍णींमुळे NDAचा विक्रमी विजय : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

14 Nov 2025 17:59:14
Eknath Shinde
 
मुंबई : ( Bihar Assembly Election Result 2025 ) बिहार निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि. १४) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु आहे. अंतिम फेरीतील मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल हाती येईल. दरम्यान, बिहारमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
 
बिहारच्या विजयाचे श्रेय हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहि‍णींना दिले आहे. "मी आज लाडक्या बहि‍णींचे अभिनंदन करतो, आज लाडक्या बहि‍णींमुळे एनडीएचा विजय झाला. त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथे मतदान केले. तसाच विजय बिहारमध्येही मिळाला आहे. बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं आणि विकासराज स्वीकारलं", असे वक्तव्य उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0