मुंबई : (Cooperation, Agriculture And Industry) 'सहकार, कृषि आणि उद्योग (Cooperation, Agriculture And Industry) हे भारताच्या विकासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. कृषि, व्यापार आणि उद्योग (Cooperation, Agriculture And Industry) यांनी परस्पर सहयोगाने आणि परस्परावलंबीपणे एकत्र प्रगती करावी', असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित ‘१०० वर्षांची संघ यात्रा’ या मालिकेअंतर्गत, कॉन्स्टिट्यूशन क्लब, जयपूर येथील पृथ्वीराज चौहान सभागृहात झालेल्या ‘उद्योजक संवाद – नव्या क्षितिजाकडे’ या कार्यक्रमात राजस्थानमधील प्रमुख उद्योजकांना संबोधित करत होते. (Cooperation, Agriculture And Industry)
उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, राष्ट्राला परम वैभवसंपन्न आणि विश्वगुरू बनवणे हे एका व्यक्तीच्या हातात नाही. हे सर्वांचे कार्य आहे आणि सर्वांना सोबत घेऊनच हे साध्य होईल. संघ कोणालाही नष्ट करण्यासाठी बनलेला नाही. भारतातील आपली ओळख ‘हिंदू’ ही आहे, आणि ‘हिंदू’ हा शब्द सर्वांना एकत्र आणणारा आहे. आपला देश संस्कृतीच्या आधारावर एक आहे. (Cooperation, Agriculture And Industry)
हेही वाचा : Bihar Assembly Election Result 2025 : "एनडीए जोरदार आघाडीवर..."; बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान, काँग्रेसला दिला घरचा आहेर
संघाच्या आगामी कार्याबद्दल (Cooperation, Agriculture And Industry) बोलताना सरसंघचालकांनी सांगितले की, संपूर्ण समाज देशहितासाठी जगणे हेच संघाचे पुढील ध्येय आहे. समाजातील सज्जनशक्ती जागृत व्हावी, सामाजिक समरसतेचे वातावरण निर्माण व्हावे, मंदिर, पाणी, स्मशान हे सर्वांसाठी खुले असावे. परिवारातील सर्वांनी आठवड्यातून किमान एकदा एकत्र येऊन भोजन-भजन करावे, स्वतःच्या भाषेत व परंपरेनुसार आचरण करावे. पाणी वाचवणे, झाडे लावणे, प्लास्टिक हटवणे अशा पर्यावरण संवर्धनाच्या कामात पुढे यावे. 'स्व’चा बोध, स्वदेशीची भावना सर्वांच्या मनात जागृत झाली पाहिजे. देश स्वावलंबी बनावा. नागरिक कर्तव्य आणि अनुशासनाबद्दल आपण सजग व्हावे, नियम-कायदे-संविधानाचे पालन करावे. (Cooperation, Agriculture And Industry)
सरसंघचालक पुढे म्हणाले, लघु आणि मध्यम उद्योगांना आपल्या देशात चालण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हे मोठ्या उद्योगांचे कर्तव्य आहे. लहान उद्योगांनी रोजगार, कौशल्य, उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे. (Cooperation, Agriculture And Industry)