रागा-उबाठांचे ‌‘जेन-झी‌’बद्दलचे स्वप्न!

13 Nov 2025 11:09:44
Rahul Gandhi
 
निवडणुकीपूर्वी मतदारयादीतील घोळाबद्दल ‌‘कथित प्रेझेंटेशन‌’ देताना राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी ‌‘जेन-झी‌’ला साद घालण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न पाहाता, दोघांनाही भारतीय ‌‘जेन-झी‌’चा डीएनए कळलेलाच नाही. त्यानिमित्ताने भारतीय ‌‘जेन-झी‌’च्या लोकशाही आणि या सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे हे आकलन...
 
राहुल गांधींना असे वाटू लागले की, त्यांना आता ‌‘व्होटचोरी‌’च्या ‌‘फेक नॅरेटिव्ह‌’वर निवडणूक जिंकता येईल. यात त्यांचे तारणहार होतील ते कोण? तर ‌‘जेन-झी‌’. हे ‌‘जेन-झी‌’ कोण तर ते आधी समजून घेऊ. 1996 किंवा 1997 पासून ते 2010 पर्यंत जन्मलेली ही पिढी, जी आता काही अंशी सामाजिकदृष्ट्या मुख्य प्रवाहात आहे. म्हणजे काय? तर नोकरी, शिक्षण, समाज आणि राजकारण या सर्व व्यासपीठांवर या पिढीला काळानुसार स्थान मिळू लागले आहे. नोकरदारवर्गातील ‌‘जेन-झी‌’ हा तर वेगळा विषय. मात्र, आज प्रामुख्याने ‌‘जेन-झी‌’च्या सामाजिक आणि राजकीय समजाविषयीचे आकलन करण्याचा हा प्रपंच.
 
‌‘जेन-झी‌’पूवची पिढी म्हणजे ‌‘मिलेनियल्स‌’ आणि ‌‘जेन-झी‌’नंतरची पिढी म्हणजे ‌‘अल्फा.‌’ ‌‘जेन-झी‌’च्या जन्मापासून देशात सुरू झाली ती ‌‘मोबाईल‌’ आणि ‌‘इंटरनेट‌’ क्रांती. साहजिकच ही पिढी ‌‘स्मार्टफोन्स‌’च्या युगातील ‌‘स्मार्ट‌’ पिढी म्हणून उदयाला आली. अगदी कोवळ्या वयात मोबाईल आणि अन्य तंत्रज्ञान हाताळता आल्याने ही पिढी मागील पिढ्यांपेक्षा याबाबतीत एक पाऊल पुढे!
मात्र, इथे विषय आहे, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या मनातील ‌‘जेन-झी‌’बद्दलचा! त्यांच्या मते, ‌‘जेन-झी‌’ त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरेल, नेपाळ-श्रीलंकेप्रमाणे सत्ता उलथवून लावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला नामोहरम करेल. पण, दोघांच्याही दुर्दैवाने असे काहीही हेोणे नाही. ही नवी पिढी ‌‘थेट आणि ग्रेट‌’ असली तरीही अध्यात्म, श्रद्धा हे या पिढीच्याही आकलनाचे विषय आहेत. कुंभमेळा असो वा देशभरातील ज्योर्तिलिंगांचे तीर्थाटन, ‌‘जेन-झी‌’ तिथेही आघाडीवर असतात. ‌‘रिल्स‌’ पाहून का होईना, पण श्रद्धा नाकारणारी ही नवी पिढी नाही. प्रथा-परंपरा झुगारणेही नव्हे, तर त्याच्या मुळाशी जाऊन त्याचे अध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व जाणून घेण्याची इच्छा समजून घेणारी ही पिढी आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील आणि ते विश्वास ठेवतील, इतका हे ‌‘जेन-झी‌’ नक्कीच दुधखुळे नाहीत.
 
देशात सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणाला म्हणजेच ‌‘एसआयआर‌’ प्रक्रियेला विरोध करायचा आणि दुसरीकडे मतदारयादीत घोळ आहेत, म्हणून निवडणूकाच पुढे ढकला, अशी आरोळी ठोकायची, हा दुटप्पीपणा याच ‌‘जेन-झीं‌’नी सोशल मीडियावर उघडा पाडला. इतकेच नव्हे, तर राहुल गांधींच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या कथित ‌‘सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स‌’ची पोलखोल याच ‌‘जेन-झीं‌’नी त्यांचेच व्हिडिओ दाखवून केली. ‌‘सैय्यारा‌’ चित्रपट पाहून ‌‘जेन-झी‌’ला अश्रू अनावर झाले, म्हणून आपणही चॅनलवर येऊन काहीबाही बडबडलो, तर आपल्या पाठीशीही ही पिढी उभी राहील, हा गैरसमज आधी दूर करायला हवा.
 
राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनमध्ये होणाऱ्या तांत्रिक चुका, त्यांच्या आधीच्या आणि आत्ताच्या वक्तव्यातील विसंगती हीच मुळाच सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरला. त्यांच्याकडून या दोन्ही नेत्यांना अपेक्षा आहे. याउलट ‌‘जेन-झी‌’ला आपलंसं करणं, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य वेळेत हेरलं.परीक्षेचा, नोकरीचा आयुष्यातील कुठल्याही गोष्टींचा ताण घेऊ नका, हे आपले पंतप्रधान ‌‘पॉडकास्ट‌’द्वारे सांगतात. विश्वचषक जिंकल्यानंतर संघाच्या प्रत्येक खेळाडूची आपले पंतप्रधान आपुलकीने विचारणा करतात. हे खेळाडू या पिढीचे ‌‘स्टाईल आयकॉन‌’ आहेत. देशाचे पंतप्रधान आपल्या ‌‘स्टाईल आयकॉन‌’शी आपुलकीने बोलतात, हे कुणाला आवडणार नाही? नुसते तलावात उतरून मासे पकडले व सूर मारून दाखवल्याने राहुल गांधींचे कार्यकर्ते कदाचित उत्साहित होतीलही, पण ‌‘जेन-झी‌’ नव्हे!
 
उद्धव ठाकरे म्हणतात, ‌‘जेन-झी‌’ला घाबरुन निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये तरुणांना मतदानाचा अधिकार देत नाही. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. उलट याच ‌‘जेन-झी‌’ने मतदार ओळखपत्र कसे तयार करावे, याबद्दलची प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीत सांगितली आहे. सरकारी योजना, धोरणे, जगभरातील घडामोडींचे विलेषणही ही नवी पिढी अचूकपणे करते. पहिल्यावहिल्या मतदारांना उद्देशून राहुल गांधींनीही बिहारच्या रॅलीत काही म्हटले होते. ते म्हणाले होते की, “ ‌‘जेन-झीं‌’नी जरा राजकारणाबद्दल सकारात्मक व्हायला हवं, गांभीर्याने याकडे पाहायला हवं. तुम्ही पहिल्यांदा मतदान करत आहात.” अर्थात, 14 लाख नवे मतदार यंदा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी उतरले. त्यांनी राहुल गांधींचे ऐकले की काय? अशी शक्यता काल-परवा जाहीर झालेल्या भाजपप्रणीत रालोआला मिळालेल्या ‌‘एक्झिट पोल‌’चा कौल पाहता प्रकर्षाने अधोरेखित होते.
 
‌‘लोकशाही धोक्यात आहे, आपण उठाव केला पाहिजे‌’ वगैरे वगैरे कितीही कोलाहल केला, तरीही भारतातील ‌‘जेन-झी‌’ राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेसारख्या नेत्यांना प्रतिसाद देणार नाही. काल एक, आज एक आणि उद्या एक बोलणाऱ्यांवर कोण विश्वास ठेवेल? नेपाळ-श्रीलंकेची स्थिती जशी झाली तशीच भारतात व्हावी, अशी एकंदरित यांची विद्ध्वसंक स्वप्ने असतील, तर लोकशाही कोणामुळे धोक्यात येईल, हे न कळण्याइतपत ‌‘जेन-झी‌’ला या नेतेेमंडळींनी वेडे समजू नये. उठसूट रा.स्व.संघ आणि हिंदुत्वावर टीका करणाऱ्या या दोन्ही विरोधी पक्षांना सर्वाधिक ‌‘जेन-झी‌’ हिंदू धर्मात आहेत. हिंदूंच्या आस्थेशी खेळणाऱ्यांचे ऐकून ते उठाव करतील नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये झाले आता भारतातही होईल याचे दिवास्वप्न कुणीही पाहू नये.
नव्या पिढीने गेल्या काही वर्षांत देशाचा होणारा सर्वांगीण कायापालट पाहिला आहे. केवळ पाहिलाच नाही तर, भारताची घोडदौड या पिढीने प्रत्यक्ष अनुभवली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती जगभरात पोहोचविली. भारताची बदललेली जागतिक प्रतिमा, गर्वाने उंचावणारी मान त्याचा पुरावाच अनेक ‌‘सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स‌’नी वेळोवेळी दिला, अशी अनेक उदाहरणे देता येतील.
 
कित्येक वर्षांपूवपासून वापरात असलेल्या मतदारयांद्यांमध्ये अचानक घोळ झाला, हे सांगण्यासाठी राहुल गांधी ज्या पोटतिडकीने असत्याचा आधार घेताना दिसले, तरी ‌‘जेन झी‌’ने त्यांच्याही खोटेपणाचा बुरखा फाडला आहे. एका घरात 66 बोगस मतदार राहत असल्याचा दावा त्यांनी केला होता, दुसऱ्याच दिवशी या घरातील सर्वच 66 मतदारांनी स्वतःच्या हातात मतदार ओळखपत्र दाखवत पत्रकार परिषद घेतली. भारतासारख्या देशात एका घरात 66 जण राहूच शकतात, यावरच विश्वास न बसणाऱ्या राहुल गांधींना हे वाटणे साहाजिकच म्हणा. पण, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ‌‘जेन-झी‌’ उठाव करेल, असे वाटणाऱ्यांनो तुमची डाळ इथे कदापि शिजणार नाही!
 
Powered By Sangraha 9.0