मुंबई : (State Level Elocution Competition) वक्तृत्व म्हणजे फक्त बोलणे नव्हे — विचार मांडण्याची कला आणि सार्वजनिक संवाद साधण्याची ताकद आहे. या दृष्टीने महर्षी दयानंद एज्युकेशन सोसायटीचे महर्षी दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाने “कै डॉ. अविनाश कारंडे यांच्या स्मरणार्थ” राज्यस्तरीय आंतरमहाविद्यायीन वकृत्व स्पर्धेचे (State Level Elocution Competition) आयोजन केले आहे. हा कार्यक्रम येत्या २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे . सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र टाइम्स मुद्रित माध्यम सहयोगी व महा एमटीबी डिजिटल माध्यम सहयोगी आहे.
“तरुण पिढीमध्ये संवादकौशल्य आणि नैतिक विचारांची जोपासना करणे हे अतिशय गरजेचे आहे. अशी स्पर्धा विद्यार्थ्यांना केवळ भाषिकच नव्हे तर सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीनेही प्रबळ बनवते,” असे मत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ मनीषा आचार्य यांनी व्यक्त केले व ही स्पर्धा म्हणजे विचारांना विवेकाची जोड देण्याचे एक व्यासपीठ आहे.” असे मत कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य धर्मेश मेहता यांनी व्यक्त केले. (State Level Elocution Competition)
या स्पर्धेसाठी देण्यात आलेले विषय पर्यावरणाची सुरक्षा - जबाबदारी कोणाची , शिवी :"कुल" पिढीच्या अभिव्यक्तीची नवी भाषा , २१ व्य शतकातील शिक्षणाची गरज : गुणपत्रिका की कौशल्य, वेगवान जगात नैतिक मूल्यांचे महत्व , अपघात:नुसती आकडेवारी की कुटुंबाच्या वेदना , शिवरायांचे गडकिल्ले - स्वराज्याचे आधारस्तंभ , मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी कोणाची ? , सोशल मीडिया: शाप की वरदान. (State Level Elocution Competition)
वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी प्रक्रिया आहे. तरुणाईने अशा मंचांवरून समाजोपयोगी विचार मांडले पाहिजेत आणि आपल्या आवाजातून सकारात्मक विचारांचा प्रसार करावा असे मत कार्यक्रमाचे आयोजक सुशांत भोसले (इतिहास विभाग) यांनी व्यक्त केले . (State Level Elocution Competition)
हा कार्यक्रम ११ वी व १२ वी च्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुला आहे विजेत्यांना आकर्षक पारितोषिके (प्रथम रु. ५०००/-, द्वितीय रु. ३०००/-, तृतीय रु. २०००/-) आणि उत्तेजनार्थ पारितोषिके व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
महर्षी दयानंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती कवल वर्मा मॅडम , सचिव सोनिया गांधी ओके मॅडम यांनी या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देत शुभेछ्या दिल्या . तसेच सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ मनीषा आचार्य मॅडम, उप प्राचार्य (प्रशासकीय विभाग) प्राध्यापक बी टी निकम सर यांच्या सहकार्याने व उपप्राचार्य धर्मेश मेहता सर पर्यवेक्षक मनोज सिंग सर, प्राचार्यांच्या सल्लागार समितीचे सदस्य कुऱ्हाडे सर आणि सौं अनिजु थॉमस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकेत्तर कर्मचारी प्रमुख अवधूत ठुकराल व एम डी युनिट प्रमुख सचिन नरळे यांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन सुशांत भोसले सर व त्यांची टीम करत आहे . (State Level Elocution Competition)