समाजवादी की दहशतवादी?

13 Nov 2025 11:20:17

Bomb Blast
 
एकीकडे देशभरात दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर सर्वत्र संतापाचे वातावरण असताना, दुसरीकडे समाजवादी पाट आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केलेल्यांना पाठीशी घालण्याचा निर्लज्जपणाचा प्रकार पाहायला मिळाला. समाजवादी पक्षाचे वाचाळ नेते आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी ‌‘निर्दोषांना शिक्षा नको‌’ अशी बांग ठोकली. एवढेच नव्हे, तर दिल्लीच्या बॉम्बस्फोटाची तुलना 2006च्या मुंबई लोकलमधील स्फोटाशी करुन, तेव्हाही निर्दोषांना पोलिसांनी अशीच अटक केली होती आणि नंतर न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले, अशी मल्लिनाथी आझमींनी केली.
 
एकूणच काय तर आतापर्यंत तपास यंत्रणांनी अटक केलेल्या त्या सगळ्या मुस्लीम ‌‘डॉक्टरांना‌’ थेट निर्दोषत्वाचे प्रमाणपत्रच बहाल करुन आझमी मोकळे झाले. पण, अखिलेश यादवांच्या नेतृत्वातील समाजवाद्यांकडून अशाप्रकारे या विशिष्ट धमयांची, त्यांच्या कौमची पाठराखण करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूवही समाजवाद्यांनी दहशतवाद्यांची अशीच तळी उचलली होती. 2007च्या गोरखपूर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि ‌‘हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी‌’ या ‌‘अल-कायदा‌’ आणि तालिबानशी संलग्न दहशतवादी संघटनेच्या तारिक कासीमवरील आरोपही तत्कालीन अखिलेश सरकारने मागे घेतले होते.
 
2012च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूव जाहीरनाम्यातही सत्तेत आल्यास, निर्दोष मुस्लिमांवरील दहशतवादाशी संबंधित खटले रद्दबातल ठरविण्याचे आश्वासनच सपाने दिले होते. मग काय, सत्तेत आल्यानंतर अखिलेश सरकारने असे 14 खटले मागे घेण्याचा निर्णयदेखील घेतला. पण, अलाहाबाद उच्च न्यायालयात अखिलेश सरकारच्या या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि या निर्णयाला स्थगिती मिळाली. अशाप्रकारे निष्पापांचे बळी घेणाऱ्यांना पंखाखाली घेण्याचे एकमेव कारण म्हणजे, बळी घेणारेही त्याच कौमचे, ज्यांच्यावर सपाची मदार, मग ते उत्तर प्रदेश असो वा महाराष्ट्र! अल्पसंख्याकांची ही हक्काची मतपेढी शाबूत ठेवण्याचा मार्ग अशा दहशतवाद्यांच्या समर्थनातून गेला तरी चालेल, असे हे प्रसंगी राष्ट्रीय सुरक्षेलाही नख लावणारे तुष्टीकरणाचे तुच्छ राजकारण! म्हणूनच मग दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्या अशा समाजवाद्यांना कुणी दहशतवादी का म्हणू नये, हाच खरा प्रश्न!
 
दहशतवाद्यांचा कळवळा...
 
डॉ. मोहम्मद उमर, डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल अहमद, डॉ. शाहीन शाहिद, डॉ. उमर नबी... दिल्ली बॉम्बस्फोटानंतरच्या कारवाईत चर्चेत असलेली ही पाच नावे. ही पाचही नावे वाचून यांचा धर्म कोणता, हे वेगळे सांगण्याची मुळी गरजच नाही. परंतु, तरीही “दहशतवादी हे मुस्लीम असू शकत नाही,” अशी सारवासारव जर कोणी करीत असेल, तर ते निव्वळ ‌‘धर्मांध‌’ नव्हे, तर त्यांना ‌‘देशद्रोही‌’च संबोधणे उचित ठरावे. विशेष म्हणजे, हे अकलेचे तारे तोडणारे गृहस्थ म्हणजे काँग्रेसशासित कर्नाटकचे अल्पसंख्याक मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान! “दहशतवादाची इस्लाममध्ये परवानगी नाही.
 
त्यामुळे दहशतवादी हे मुस्लीम असूच शकत नाही,” असा जावईशोधही या खानांनी लावला. तसे असेल तर ‌‘जिहाद‌’च्या नावाखाली भारतातच नाही, तर अख्ख्या जगाविरोधात इस्लामने छेडलेल्या धर्मयुद्धाला, दहशतवाद नाही तर काय म्हणावे? आतापर्यंत भारतात झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणारे षड्यंत्रकारी आणि त्याची क्रूरपणे अंमलबजावणी करणाऱ्या नराधमांचा धर्म तरी कोणता होता? हे खान यांना ठावूक नाही, असे अजिबात नाही. त्यामुळे ‌‘दहशतवादाला धर्म नसतो‌’ या थोतांडापलीकडे जाऊन आता ‌‘दहशतवादी हे मुस्लीम असूच शकत नाही‌’ या भ्रामक धारणेला जनमानसात पेरण्याचा हा आणखीन एक फुटकळ प्रयत्न! आणि याच खान महाशयांना ‌‘उमर‌’, ‌‘गनी‌’, ‌‘अहमद‌’, ‌‘सईद‌’ ही आडनावेच मुळी मुस्लीम वाटत नाही, यापेक्षा हास्यास्पद ते दुसरे काय? पण, आपल्या धर्मबंधूंची पाठराखण करुनच हे मंत्रिमहोदय शांत बसले नाहीत, तर त्यांनी या स्फोटाच्या ‌‘टायमिंग‌’वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
 
दिल्लीतील बॉम्बस्फोट बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येलाच कसा झाला, असे म्हणत या मंत्रिमहोदयांनी घटनेलाही राजकीय रंग दिला. पण, या बॉम्बस्फोटापूवची तपास यंत्रणांची ठिकठिकाणची अटकसत्रे आणि फरिदाबादमध्ये जप्त केलेली 2900 किलोंची स्फोटके, यांचा खान महाशयांना सपशेल विसर पडलेला दिसतो. तसे होणे म्हणा स्वाभाविकच. देशप्रेमापेक्षा धर्मवेडेपणाची पट्टी डोळ्यांवर बांधलेली असेल, तिथे ढळढळीत सत्य दिसत असूनही नसल्यासारखेच! पण, यानिमित्ताने पुन्हा एकदा ‌‘काँग्रेसचा हात दहशतवाद्यांच्या समर्थनात‌’ हेच सिद्ध झाले!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0