Pakistan Newspaper Dawn : पाकिस्तानचा नवीन पराक्रम; पाकिस्तानी प्रसिद्ध वृत्तपत्र 'डॉन'ने चॅटजीपीटी इनपुटसह छापली बातमी, बातमीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

13 Nov 2025 17:04:53

Pakistan Newspaper Dawn

 
मुंबई : (Pakistan Newspaper Dawn) पाकिस्तानमधील प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र 'डॉन' याच्यातील एक मजेशीर गोंधळ सध्या भलताच व्हायरल होतोय. डॉन (Pakistan Newspaper Dawn), अलीकडेच त्यांच्या प्रकाशित बातम्यांपैकी एकामध्ये एआय प्रॉम्प्ट सापडल्याने अडचणीत आले आहे. १२ नोव्हेंबर रोजी बिझनेस विभागात "ऑटो सेल्स रिव्ह अप इन ऑक्टोबर" या शीर्षकाच्या वृत्तात ही चूक झाली होती. शेवटच्या परिच्छेदात स्पष्टपणे चॅटजीपीटी-शैलीचा संदेश छापण्यात आला होता, ज्यामुळे संपादक छापण्यापूर्वी तो डिलीट करायला विसरले हे सिद्ध झाले आहे. आता वाचकांनी या बातमीचे फोटो काढत सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, आणि ही पोस्ट संध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 
दरम्यान, आता सोशल मीडियावर अनेक पत्रकारांनी आणि लोकांनी या निष्काळजीपणाची खिल्ली उडवली आहे. अनेक एक्स वापरकर्त्यांनी शेवटच्या परिच्छेदाचे स्क्रीनशॉट शेअर केले होते ज्यात, शेवटच्या परिच्छेदात "जर तुम्हाला हवे असेल तर मी आणखी जलद 'फ्रंट-पेज स्टाईल' आवृत्ती देखील तयार करू शकतो..." असे लिहिलेले होते. (Pakistan Newspaper Dawn)
 
हेही वाचा :  India House : लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार


अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली आणि म्हटले की, पाकिस्तानच्या सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठित वृत्तपत्रांपैकी एकाकडून असा निष्काळजीपणा होणे, हे धक्कादायक आहे. या घटनेमुळे लोकांना प्रश्न पडला की डॉन एडिटिंग आणि लेखनासाठी एआय नेमका किती वापरतात. (Pakistan Newspaper Dawn)
 
पत्रकार उमर कुरैशी यांनी परिस्थितीची खिल्ली उडवत, ते म्हणाले की, "पत्रकार आजकाल एआय वापरतात हे त्यांना माहित असले तरी, ही चूक खूपच जास्त मोठी आहे." दुसऱ्या पत्रकाराने टिप्पणी केली की "बिझनेस डेस्कने किमान शेवटचा परिच्छेद काढून टाकायला हवा होता." (Pakistan Newspaper Dawn)
 
हे वाचलात का ? :  Mumbra ATS Raid : दिल्ली स्फोटाचा संबंध आता मुंब्रापर्यंत!,


डॉनची ही मूर्ख चूक लवकरच सोशल मीडियावर एक मोठा विषय बनली आहे. त्यामुळे, बरेच लोक आता मोठी वर्तमानपत्रे खरोखर किती विश्वासार्ह आहेत असा प्रश्न विचारत आहेत. तर, काही लोक त्यांचे काम योग्यरित्या तपासण्याऐवजी जास्त एआय वापरल्याबद्दल संपादकांना दोष देत आहेत. (Pakistan Newspaper Dawn)
 

 
Powered By Sangraha 9.0