Mumbra ATS Raid : दिल्ली स्फोटाचा संबंध आता मुंब्रापर्यंत!,

13 Nov 2025 14:02:45
Mumbra ATS Raid
 
मुंबई : (Mumbra ATS Raid) दिल्लीतील झालेल्या स्फोटाच्या संशयित दहशतवादी सत्राशी संबंध असलेल्यांचा तपास आता मुंबई आणि पुण्याच्या सीमांपर्यंत पोहोचला आहे. अलिकडेच, पुणे एटीएसने एका सॉफ्टवेअर इंजिनिअर झुबेर हंगरगेकर याला अटक केली, ज्याचा अल कायदा संघटनांशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. (Mumbra ATS Raid)
 
झुबेर हंगरगेकर याने दिलेल्या माहितीवरून, महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा (Mumbra ATS Raid) आणि कुर्ला भागात अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मुंब्र्यातील इब्राहीम अबिदी नावाच्या एका शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. इब्राहीम अबिदी गेल्या काही वर्षांपासून मुंब्रातील (Mumbra ATS Raid) एका शालेत उर्दू प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. झुबेर आणि इब्राहीम यांच्यात असलेल्या संपर्कामुळे सुरक्षा यंत्रणांनी यांना संशयाच्या दृष्टीने तपासायला सुरुवात केली.
 
हेही वाचा :  ‘एटीएस‌’ची कारवाई; मुंब्रा येथे शिक्षक ताब्यात, कुर्ल्यातील घरावरही छापेमारी
 
दरम्यान, महाराष्ट्र एटीएसच्या छाप्यात या दोघांकडून मिळालेल्या वस्तूंमध्ये अत्यंत संवेदनशील माहिती मिळाली आहे. यात अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेन्ट संघटनेबद्दलची माहिती असलेली डिलीट केलेली फाईल्स, अल कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेन याचे ईद-उल-फितरला केलेले भाषणाचे उर्दू अनुवाद, तसेच 'इन्स्पायर' मासिकामध्ये असलेली AK-47 चालवण्याचे प्रशिक्षण, आणि घरगुती बॉम्ब तयार करण्याबद्दलची माहिती मिळाली आहे. (Mumbra ATS Raid)
 
आश्चर्याची बाब म्हणजे, झुबेर हंगरगेकरच्या जुन्या फोनमध्ये पाच आंतरराष्ट्रीय फोन नंबर सापडले आहेत. यामध्ये दोन्ही सौदी अरेबियाचे क्रमांक, आणि पाकिस्तान, कुवेत व ओमान येथील प्रत्येकी एक क्रमांक समाविष्ट आहे. या संशयास्पद संपर्कांचा तपास सुरू असून, यामुळे, या दोघांचे दिल्ली स्फोट आणि व्हाईट कॉलर मॉड्युलशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. (Mumbra ATS Raid)
 
 
Powered By Sangraha 9.0