मुंबई : (India House) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले लंडन येथील इंडिया हाऊस (India House), महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार असून, त्याचे स्मारक म्हणून जतन करेल अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकराच्या रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन (India House) दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला (India House) भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थीत भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी याबाबत मंत्रालय दालनात आमदार देवयानी फरांदे, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.
या बैठकीत "मित्रा"च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यात सामान्य प्रशासन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती ‘इंडिया हाऊस’ (India House) ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादरीकरण मांडण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.